बीजिंगच्या विमानतळावर शनिवारी सायंकाळी सहा वाजून २४ मिनिटांनी स्फोट झाल्याने परिसर हादरल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. विमानतळाच्या तिसऱ्या टर्मिनलवर हा स्फोट झाल्याचे वृत्त ‘झिन्हुआ’ या सरकारी वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
विमानतळावर हा स्फोट झालेला असला तरी त्यामध्ये कोणासही दुखापत झाल्याचे वृत्त नाही. व्हीलचेअरवरून आलेल्या जी झोंगझिंग नावाच्या व्यक्तिने हा स्फोट घडविला. यासंबंधी सीसीटीव्हीवरून माहिती मिळाली. यात तो जखमी झाला आहे. त्याने फटाक्यात वापरण्यात येणारी दारू वापरून स्फोटके तयार केली होती. या स्फोटानंतर झोंगझिंगची नेमकी काय अवस्था झाली, ते समजू शकले नाही. या घटनेच्या छायाचित्रांवरून स्फोट घडविण्यापूर्वी झोगझिंग याने आपले हात उंचावून काही तरी जोरात सांगण्याचा प्रयत्न केला होता, असे सांगण्यात आले.