रविवारी पहाटे बोधगया येथे झालेल्या साखळी स्फोटप्रकरणी तपास यंत्रणांनी एका महिलेसह आणखी चार जणांची चौकशी केली आहे. संशयास्पद हालचालींवरून तपास यंत्रणांनी ही कारवाई केली असून, सीसीटीव्ही चित्रीकरणावरून हल्लेखोरांचा नेमका माग लावता येत नसल्याचे तपास यंत्रणांनी स्पष्ट केले आहे.
बोधगया मंदिरावरील दहशतवादी हल्ल्याला दोन दिवस उलटूनही अद्याप काही ठोस धागेदोरे तपास यंत्रणांच्या हाती लागलेले नाहीत. याप्रकरणी सोमवारी एकास अटक करण्यात आली होती. तर राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) मंगळवारी चार जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. यामध्ये एका महिलेचाही समावेश आहे.
बोधगया मंदिरापासून जवळच असलेल्या हॉटेलमधून या चौघांनी सकाळी साडेसहा वाजता म्हणजे चेक इन केल्यापासून अवघ्या दोन तासांतच, ‘चेकआऊट’ केल्याने त्यांची चौकशी करण्यात आल्याचे बिहार पोलिसांनी सांगितले. मंदिर परिसरात सापडलेल्या मतदार ओळखपत्रावरून चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आलेल्या बिनोद कुमार मेस्त्री याची एनआयएमार्फत कसून चौकशी सुरू असून त्याला अद्याप मुक्त करण्यात आलेले नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
संग्रहित लेख, दिनांक 10th Jul 2013 रोजी प्रकाशित
बोधगया स्फोटप्रकरणी ४ जणांची चौकशी
रविवारी पहाटे बोधगया येथे झालेल्या साखळी स्फोटप्रकरणी तपास यंत्रणांनी एका महिलेसह आणखी चार जणांची चौकशी केली आहे. संशयास्पद हालचालींवरून तपास यंत्रणांनी ही कारवाई केली असून, सीसीटीव्ही चित्रीकरणावरून हल्लेखोरांचा नेमका माग लावता येत नसल्याचे तपास यंत्रणांनी स्पष्ट केले आहे.

First published on: 10-07-2013 at 01:25 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Bodh gaya serial blasts four detained in patna for questioning