एपी, साओ पाउलो

ब्राझीलचे माजी अध्यक्ष जैर बोल्सोनारो यांना २०३० पर्यंत निवडणूक लढवण्यास मनाई करण्यात आली. ब्राझीलच्या सर्वोच्च निवडणूक न्यायालयाने माजी राष्ट्राध्यक्ष बोल्सोनारो यांना २०२२ च्या निवडणुकीत सत्तेचा गैरवापर, सार्वजनिक माध्यमांचा गैरवापर तसेच इलेक्ट्रॉनिक मतदान प्रणालीबाबत निराधार संशय निर्माण केल्याबद्दल दोषी ठरवले आहे. आता आठ वर्षे त्यांना निवडणूक लढवता येणार नाही. 

PM Narendra Modi
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा इंडिया आघाडीवर हल्लाबोल; म्हणाले, “देशाला लुटण्याची योजना…”
Varsha Gaikwad met Congress leader Priya Dutt Mumbai
वर्षा गायकवाड यांचे पहिले सत्र मनधरणीचे
Dhule District Congress President,
धुळे जिल्हा काँग्रेस अध्यक्षांचा राजीनामा देण्याचे कारण काय ?
Prime Minister Narendra Modis meeting in Baramati Lok Sabha Constituency
‘बारामती’मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींची सभा?

६८ वर्षीय बोल्सोनारो यांना २०२६ च्या निवडणुकीत राजकीय पुनरागमनाची आशा होती. या न्यायालयाच्या सात न्यायमूर्तीच्या खंडपीठाने पाच विरुद्ध दोन मतांनी बोल्सोनारोंना अपात्र ठरवले. बोल्सोनारो यांनी सरकारी संपर्क माध्यमांचा आपल्या सत्तेद्वारे गैरवापर करून आपला प्रचार केला. तसेच मतदान प्रणालीबाबत मतदारांच्या मनात संशयाचे वातावरण निर्माण केले, या आरोपांच्या सतत्येबाबत पाच न्यायमूर्तीनी सहमती, तर दोन न्यायमूर्तीनी विरोधात मत नोंदवले.

बोल्सोनारो यांनी म्हटले आहे की, आपण कोणतेही चुकीचे कृत्य केलेले नाही. न्यायालयाच्या निर्णयाविरुद्ध दाद मागण्याचा त्यांचा विचार आहे. विद्यमान अध्यक्ष लुईझ इनाचियो लुला दा सिल्व्हा यांनी २०२२ च्या निवडणुकीत  बोल्सोनारो यांना पराभूत केल्यानंतर हिंसाचार झाला होता.

पुन्हा अध्यक्षपदी येण्याची शक्यता संपुष्टात

साओ पाउलो येथेली इन्स्पर विद्यापीठातील राज्यशास्त्राचे प्राध्यापक कार्लोस मेलो यांनी सांगितले, की या निर्णयामुळे बोल्सोनारोंची ब्राझीलच्या अध्यक्षपदी पुनरागमनाची शक्यता संपुष्टात आली आहे, याची जाणीव त्यांनाही एव्हाना झाली असेल. मेलो यांनी सांगितले, की आता यानंतर बोल्सोनारो आपली कैद टाळण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील. त्याचे राजकीय वजन कायम ठेवण्यासाठी त्यांचे काही सहयोगी निवडतील. परंतु ते आता पुन्हा अध्यक्षपदी येण्याची शक्यता फारच धूसर झाली आहे.