केरळचे मुख्यमंत्री ओमन चंडी आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष रमेश चेन्निथला यांच्यातील मतभेद विकोपाला गेल्याने पक्षश्रेष्ठींना त्यामध्ये हस्तक्षेप करणे अपरिहार्य ठरणार आहे. चेन्निथला यांची राज्य मंत्रिमंडळात वर्णी लावण्यावरून निर्माण झालेला गैरसमज दूर करण्यासाठी पक्षश्रेष्ठींना मध्यस्थी करावी लागणार आहे.
पक्षातील गटबाजी चव्हाटय़ावर आणण्यात एकमेकांचा हात असल्याचा आरोप दोन्ही नेत्यांच्या समर्थकांकडून केला जात आहे. काँग्रेसचे सरकार २०११ मध्ये सत्तेवर आले आहे. चेन्निथला यांचे समर्थक कोची येथे भेटणार असून आपली रणनीती ठरविणार आहेत आणि त्यानंतर केंद्रीय नेतृत्वाची भेट घेणार आहेत, असे सूत्रांनी सांगितले.