उत्तर प्रदेशातील थंडीची जोरदार लाट कायम असून बहुसंख्य भागांतील तापमान नियमित तापमानाच्याही खाली गेले आहे. दिल्लीत किमान तापमान ५.६ अंश सेल्सिअस इतके नोंदविण्यात आले. जम्मू आणि काश्मीरमध्ये नव्याने बर्फवृष्टी झाल्याने काश्मीर खोऱ्यात रात्रीचे तापमान गोठणबिंदूखाली गेले आहे.
श्रीनगरमध्ये बर्फवृष्टी झाल्याने तेथील तापमान उणे १.८ सेल्सिअस अंशावर गेले आहे.लेह शहरात रात्रीच्या तापमानात थोडी वाढ झाली असली तरी तेथे थंडीची तीव्रता सर्वाधिक आहे. हिमाचल प्रदेशात बुधवारी हिमनग कोसळून सात जण ठार झाले असून गुरुवारीही तेथे बोचरे वारे वाहत होते.