चीनमध्ये सर्वाधिक वेगवान रेल्वेगाडी धावण्यास सुरूवात

शांघायला पोहोचण्यासाठी या गाडीला पाच तास ४५ मिनिटांचा कालावधी लागणार आहे.

 

चीनमधील बीजिंग-शांघाय या अत्यंत व्यस्त मार्गावर ४०० कि.मी. प्रतितास इतका वेग असलेली बुलेट गाडी सोमवारी प्रथमच धावली. सदर गाडीची रचना आणि उत्पादन चीनमध्येच करण्यात आले आहे.

‘फक्सिंग’ सीआर४००एएफ मॉडेलची ही गाडी बीजिंग साऊथ रेल्वे स्थानकावरून शांघायसाठी रवाना झाली, त्याचवेळी सीआर४००एएफ ही गाडी शांघाय हॉँगकिओ रेल्वे स्थानकातून बीजिंगसाठी रवाना झाली.

शांघायला पोहोचण्यासाठी या गाडीला पाच तास ४५ मिनिटांचा कालावधी लागणार आहे. वाटेत ही गाडी १० स्थानकांवर थांबणार आहे. सदर बुलेट ट्रेन ईएमयू म्हणून ओळखली जाते, ती जास्तीत जास्त ४०० कि.मी. प्रतितास वेगाने धावणार आहे, तर ३५० कि.मी. प्रतितास तिचे वेगसातत्य आहे, असे झिनुआ वृत्तसंस्थेने म्हटले आहे.

या गाडीत अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली असून ती यंत्रणा सातत्याने कामगिरीवर लक्ष ठेवणार आहे, त्याचप्रमाणे आपत्कालीन स्थितीत अथवा संकटसमयी त्या गाजडीचा वेग आपोआप कमी होणार आहे. चीन रेल्वे महामंडळाचे अध्यक्ष लू डोंगफू यांनी सांगितले की, फक्सिंग चीनच्या आइर्थक आणि सामाजिक विकासामध्ये महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. बीजिंग-शांघाय हा मार्ग चीनमधील अत्यंत गजबजलेला मार्ग असून दररोज ५० लाखांहून अधिक प्रवाशांची तेथे ये-जा होत असते. चीनमध्ये जगातील सर्वात लांब रेल्वेप्रणाली आहे. सदर बुलेट ट्रेन आपल्या मार्गात जिआन, शानडोंग प्रांत आणि तिआनजीन येथे थांबणार आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: China to launch world fastest train bullet train

ताज्या बातम्या