अयोध्येत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते राम मंदिराच्या गाभाऱ्याचं भूमिपूजन होत आहे. गाभाऱ्याच्या पहिल्या शिळेचं मंत्रोच्चारासह योगींच्या हस्ते पूजन करण्यात आलं. या भूमिपूजनासह मंदिराच्या निर्मितीचा दुसरा टप्पा सुरू झाला आहे. पहिल्या टप्प्यात मंदिराच्या चबुतऱ्याचं बांधकाम करण्यात आलं. योगी आदित्यनाथ यांनी आज (१ जून) आधी हनुमान गढी येथे येऊन प्रथम दर्शन घेतलं आणि मग राम मंदिर गाभाऱ्याची पहिली शिळा ठेवली.

या गाभाऱ्याचं काम डिसेंबर २०२३ पर्यंत पूर्ण होईल असं सांगितलं जात आहे. तसेच २०२४ मधील मकरसंक्रातीला प्रभू श्रीरामांच्या मूर्तीची या गाभाऱ्यात प्राणप्रतिष्ठा होईल, असा अंदाज वर्तवला जात आहे. २०२४ मध्ये लोकसभा निवडणूक असणार आहे. या पार्श्वभूमीवर हे काम पूर्ण करण्यासाठी प्रयत्न केला जात असल्याचंही बोललं जात आहे.

uddhav devendra Fadnavis
“मी नागपुरी आहे, त्यामुळे मला त्यांच्यापेक्षा…”, देवेंद्र फडणवीसांचं उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला प्रत्युत्तर
Dudhganga tap water scheme,
इचलकरंजीची दूधगंगा नळपाणी योजना रखडल्याच्या मुद्द्यावरून मुख्यमंत्री शिंदे यांच्यावर राजू शेट्टी यांचे टीकास्त्र
Police dressed as priests in Uttar Pradesh
अन्वयार्थ : पोलीस पुजारी.. की पुजारी पोलीस!
Mallikarjun Kharge criticizes Dalit oppression in Narendra Modi Maharashtra state
मोदींच्या राज्यात दलितांवर अत्याचार; मल्लिकार्जुन खरगे यांची टीका

हेही वाचा : राज ठाकरे माफी मागा; बृजभूषण सिंह यांच्यानंतर भाजपाच्या आणखी एका खासदाराचा विरोध; म्हणाले “विभीषणही…”

भूमिपूजनानंतर जवळपास दीड वर्षांनी ठेवली राम मंदिर गाभाऱ्याची पहिली शिळा

सर्वोच्च न्यायालयाने ९ नोव्हेंबर २०१९ रोजी राम मंदिराबाबतचा निकाल दिला. त्यानंतर ५ ऑगस्ट २०२० ला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राम मंदिराच्या कामाचं भूमिपूजन केलं होतं. त्यानंतर पहिल्या टप्प्यात मंदिराच्या चबुतऱ्याचं काम झालं आणि दुसऱ्या टप्प्यात जवळपास दीड वर्षांनी राम मंदिराच्या गाभाऱ्याची पहिली शिळा ठेवली जात आहे.