एका छोटय़ा डोंगराएवढा धूमकेतू मंगळाजवळून गेला. लाखो वर्षांतून घडणाऱ्या या घटनेमुळे अवकाशयानांना निरीक्षणाची संधी मिळाली. दरम्यान नासाचे मावेन व इस्रोचे मंगळयान ही अवकाशयाने या धुमकेतूच्या आघातातून वाचावीत  यासाठी त्यांची स्थिती बदलण्यात आली होती.
सायडिंग स्प्रिंग (सी /२०१३ ए१) असे या धूमकेतूचे नाव असून तो २.२७ वाजता मंगळाजवळून ताशी २०३००० किलोमीटर वेगाने गेला. जवळच्या अवस्थेत तो मंगळापासून १३९५०० किलोमीटर अंतरावरून गेला. हे अंतर पृथ्वी व चंद्रातील अंतराच्या निम्मे होते. हा धूमकेतू जवळून गेल्याचा संदेश मिळाल्याचे युरोपीय अवकाश संस्थेने ट्विटरवर म्हटले आहे. धूमकेतू तेथून जाण्यापूर्वी त्याच्या शेपटीचा पिसारा दिसला. धूमकेतूची शेपटी बर्फ, धूळ, खडक यांनी बनलेली असते. सौरमालेत उर्टच्या ढगात धूमकेतूंची निर्मिती होते. हा धूमकेतू एक मैल रुंद व घन स्वरूपात आहे. टाल्कम पावडरच्या थरांप्रमाणे तो दिसतो. नासाची जी अवकाशयाने मंगळाभोवती फिरत आहेत

धूमकेतूचा जन्म
धूमकेतू सूर्यमालेत उर्टच्या ढगात तयार होतात. ते धूळ व बर्फाने बनतात.
सायडिंग स्प्रिंग धूमकेतू
वेग ताशी २०३००० कि.मी.
एक मैल रुंद
टाल्कम पावडरच्या थरांसारखे रूप
मंगळापासून जवळचे अंतर १३९५०० कि.मी.