आगामी लोकसभा निवडणुकांसाठी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांची पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून घोषणा करणार नसल्याचे पक्षाचे सरचिटणीस दिग्विजय सिंग यांनी स्पष्ट केले आहे. भाजपच्यावतीने गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना संभाव्य पंतप्रधानपदाचा उमेदवारम्हणून घोषित करण्याचे वारे वाहत असताना प्रत्युत्तरात काँग्रेसकडून राहुल गांधी यांचे नाव काँग्रेस पक्षामार्फेत पंतप्रधानपदाचा उमेदवार म्हणून जाहीर केले जाईल का? या प्रश्नाच्या उत्तरात दिग्विजय सिंग यांनी निवडणुकांआधी पंतप्रधानपदाचा उमेदवार जाहीर करण्याची पद्धत काँग्रेसमध्ये नाही. त्यामुळे राहुल गांधी यांचे नाव घोषित करण्याचा मुद्दाच उपस्थित होत नाही असे म्हटले.
त्याचबरोबर पुढील निवडणुकांत पक्षाला यश प्राप्त झाल्यास डॉ.मनमोहन सिंग यांना पुन्हा पंतप्रधान पद देण्यात येईल. यावरही त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. “काँग्रेस पक्ष निवडणुकांपूर्वी पंतप्रधान किंवा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार जाहीर करत नाही. त्यानुसार कर्नाटक विधानसभा निवणुकांमध्येही काँग्रेस पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर केला नव्हता. असेही दिग्विजय सिंग म्हणाले.