काँग्रेसकडून शनिवारी राज्यसभेसाठीच्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली. यामध्ये महाराष्ट्रातून माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांना उमेदवारी देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी महाराष्ट्रातील आमदारांनी राज्यसभेसाठी बाहेरच्या राज्यातील उमेदवार लादू नका, अशी उघड मागणी केली होती. मात्र, चिदंबरम यांच्या या निवडीमुळे पक्षनेतृत्त्वाने या मागणीकडे साफ दुर्लक्ष केल्याचे दिसते. पक्षातील वरिष्ठ नेत्यांशी चर्चा केल्यानंतर काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी उमेदवारांच्या यादीवर शिक्कामोर्तब केले.
राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस आमदारांची मंगळवारी बैठक झाली होती. त्यावेळी बाहेरच्या राज्यातील नेत्याचे ओढणे गळ्यात बांधू नका, राज्यातील कोणत्याही नेत्याला संधी द्या, अशी मागणी काँग्रेस आमदारांकडून करण्यात आली होती.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्यसभेसाठी काँग्रेस उमेदवारांची यादी
महाराष्ट्र- पी. चिदंबरम, पंजाब- अंबिका सोनी, उत्तर प्रदेश- कपिल सिब्बल, कर्नाटक- ऑस्कर फर्नांडिस, कर्नाटक- जयराम रमेश, उत्तराखंड- प्रदीप तम्टा, मध्य प्रदेश- विवेक तंखा, छत्तीसगड- छाया वर्मा

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress nominate p chidambaram for rajya sabha from maharashtra
Show comments