प्रत्येक शहरामध्ये वेगवेगळ्या ऑफीसेससाठी काही ठराविक जागा असतात. या जागांचे दरही गगनाला भिडलेले असतात. या सर्वात महागड्या जागांमध्ये भारताची राजधानी असलेल्या दिल्लीतील कॅनॉट प्लेस ही जागा ९ व्या स्थानावर आहे. नुकत्याच करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणावरुन ही बाब समोर आली आहे. याठिकाणी एक स्क्वेअरफूट जागेची किंमत १०,५२६ रुपयांच्या आसपास आहे. मागील वर्षी कॅनॉट प्लेस १० व्या स्थानावर होती. तर यंदा ती ९ व्या स्थानावर आली आहे. तर या यादीत मुंबईतील बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स २६ व्या स्थानावर असून येथील ऑफीसमध्ये १ स्क्वेअरफूटासाठी ६,६३९ इतकी आहे. मुंबईमधील बिझनेसचे मुख्य केंद्र मानले जाणारे नरीमन पॉईंट हे ठिकाण ३० वरुन ३७ व्या स्थानावर आले आहे. आता याठिकाणी प्रतिस्क्वेअरफूट ५ हजार इतका दर आहे.

याबाबत संबंधित अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, कॅनॉट प्लेस हे दिल्लीतील एक महत्त्वाचे मार्केट म्हणून ओळखले जाते. हाँगकँग येथील हाँगकाँग सेंट्रल हे ऑफीसचे सर्वात जास्त भाडे असण्याच्या बाबतीत पहिल्या स्थानावर आहे. त्याचा दर प्रतिस्क्वेअरफूट २१ हजारांहून अधिक आहे. त्याखालोखाल लंडनमधील वेस्टएंड या जागेचा नंबर लागतो. तर बिजिंगमधील फायनान्स स्ट्रीट, हाँगकाँगमधील कॉवलून आणि बिजिंगमधील सीबीडी यांचा क्रमांक लागतो. तर न्यूयॉर्कमधील मिडटाऊन-मेनहट्ट्नने सहावे स्थान पटकावले आहे. येथे ऑफीसचे भाडे प्रतिस्क्वेअरफूट १२,६४४ इतके आहे.