१.३ अब्ज पौंडाची रेडिओ दुर्बीण करणार कमाल
येत्या बारा वर्षांत विश्वातील परग्रहवासीयांशी संपर्क प्रस्थापित करण्यात जगातील सर्वात मोठय़ा रेडिओ दुर्बिणीच्या मदतीने यश येईल, असा दावा अज्ञात उडत्या वस्तूंविषयीचे तज्ज्ञ म्हणजेच यूएफओ तज्ज्ञ व इंग्लंडच्या यूएफओ संरक्षण प्रकल्पाचे प्रमुख निक पोप यांनी केला आहे.
अज्ञात उडत्या वस्तूंचा पोप यांनी गेली २१ वर्षे अभ्यास केला आहे. परग्रहावरील जीवसृष्टी आहे काय, या प्रश्नाचे उत्तर २०२४ पर्यंत मिळालेले असेल असे त्यांनी सांगितले. १.३ अब्ज पौंड खर्च करून एक रेडिओ दुर्बीण उभारली जात असून तिच्या मदतीने हे शक्य होणार आहे. स्क्वेअर किलोमीटर अ‍ॅरे टेलिस्कोप (एसकेए) या दुर्बिणीमुळे अधिक नवीन व उत्कंठावर्धक शक्यता निर्माण झाल्या आहेत. परग्रहावर कुठल्याही स्वरूपात जीवसृष्टी असेल किंवा परग्रहवासीय खरोखर अस्तित्वात असतील तर २०२४ पर्यंत त्यांच्याशी संपर्क निश्चितपणे झालेला असेल. फक्त त्यासाठी ही दुर्बीण वेळेत कार्यान्वित होणे गरजेचे आहे.
 एसकेए ही दुर्बीण २०१६मध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा असून ती जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण आहे, त्यामुळे आपल्या विश्वातील अनेक कोडी उलगडणार आहेत. हजारो रेडिओ लहरी संग्राहकांचा वापर करून या दुर्बिणीने पृथ्वीचा ४९२१ वर्गकिलोमीटर इतक्या भागात ती ऑस्ट्रेलियात उभारली जात आहे. प्रकाशीय दुर्बिणींपेक्षा विश्वाबाबत अधिक वेगळा दृष्टिकोन मिळणार आहे.
ही दुर्बीण पन्नास पटींनी जास्त संवेदनशील असणार असून कुठल्याही दुर्बिणीपेक्षा दहा हजार पट वेगाने आकाशाचे निरीक्षण करण्याची या रेडिओ दुर्बिणीची क्षमता असणार आहे. जर १०० प्रकाशवर्षे अंतरापर्यंत विश्वात कुठेही प्रगत जीव असतील तर ही दुर्बीण त्यांना शोधून काढील, असे ते म्हणाले. आतापर्यंतच्या संशोधनानुसार १० टक्के लोकांनी उडत्या तबकडय़ा पाहिल्याचा दावा केला असून ही संख्या इंग्लंडमध्येच ६० लाख इतकी आहे.
जेव्हा मी यूएफओचे संशोधन करीत होतो, त्या वेळी प्रत्येक वर्षी उडत्या तबकडय़ा पाहिल्याच्या अनेक बातम्यांचा अभ्यास केला. त्यातील दहा टक्के घटना खरोखर आश्चर्यकारक आहेत.
परग्रहवासीय कशा पद्धतीने पृथ्वीवासीयांशी संपर्क साधतील असे विचारले असता पोप यांनी सांगितले, की एकतर ते ई-मेलने संवाद साधतील किंवा सर्वाधिक शक्यता म्हणजे रेडिओ संदेशांच्या मदतीने ते संपर्क साधतील.
नक्की होणार काय?
एसकेए ही दुर्बीण २०१६मध्ये कार्यान्वित होण्याची अपेक्षा असून ती जगातील सर्वात मोठी रेडिओ दुर्बीण आहे, त्यामुळे आपल्या विश्वातील अनेक कोडी उलगडणार आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Contect is genrated towards other planet residents in comeing 12 years nick pope
First published on: 26-12-2012 at 04:00 IST