गायीच्या दूधाचे फायदे लक्षात घेता गाय ही केवळ हिंदूंचीच नव्हे तर मुस्लीमांसाठीही मातेसमान आहे, असे विधान करून ज्योतिर्मठ आणि द्वारकापीठाचे शंकराचार्य श्री श्री स्वामी स्वरूपानंद सरस्वती यांनी नव्या वादाला आमंत्रण दिले आहे. गायीच्या दुधातून हिंदू धर्मीयांइतकीच पोषक मुल्ये मुस्लिमांनाही मिळतात. गायीचे दूध आरोग्यासाठी पोषक असते, हा विचार हिंदू आणि मुस्लिम दोन्ही धर्माच्या लोकांना मान्य आहे. हा दोन्ही धर्मीयांमधील समान धागा असून त्या न्यायाने मुस्लिमांसाठीही गाय मातेसमान ठरते. त्यामुळे गायींचे रक्षण करणे हे भारतीयांच्या भल्याचे आहे, मग ते कोणत्याही धर्माचे असोत, असे स्वामी स्वरूपानंद यांनी सांगितले.
शनिमंदिरातील महिलांच्या प्रवेशामुळे बलात्कार वाढतील! – शंकराचार्य स्वामी स्वरूपानंद
तसेच देशातील विविध राज्यात गोहत्येवर घालण्यात आलेली बंदी योग्य असल्याचे मतदेखील यावेळी स्वामी स्वरूपानंद यांनी व्यक्त केले. सर्वोच्च न्यायालयात वेळोवेळी गोहत्याबंदीच्या कायद्याला आव्हान देण्यात आले आहे. मात्र, अशा याचिका फेटाळल्या पाहिजेत, असे स्वामी स्वरूपानंद यांनी सांगितले. दरम्यान, गायीच्या दुधाशिवाय गोमूत्र हे अनेक जीवघेण्या आजारांवर गुणकारी असल्याचेही त्यांनी सांगितले. यापूर्वी शिर्डीचे साईबाबा हे देव नसल्याने त्यांच्या मंदिरांविरोधात या शंकराचार्यानी वक्तव्ये केली होती. एवढेच नव्हे तर धर्मसभा भरवून साईबाबांची मंदिरे ही धर्मबाह्य़ ठरवली होती. त्यावेळीही साईभक्तांमध्ये संतापाची लाट उसळली होती. आता या ताज्या वक्तव्यामुळे शनिभक्तांमध्ये असंतोष पसरण्याची शक्यता आहे.
‘स्वरूपानंद’ला सव्वातीन कोटींचा निव्वळ नफा