पेट्रोल आणि डिझेलच्या दररोज वाढत्या किंमतींमुळे त्रस्त सामान्य जनता आहे. तर दुसरीकडे राजकीय नेते यावर बेजबाबदार वक्तव्य करत आहेत. मध्य प्रदेशचे ऊर्जामंत्री प्रद्युम्नसिंग तोमर यांनी पेट्रोल आणि डिझेलच्या वाढत्या किंमतींबाबत जनतेला सूचना दिल्या आहेत. तोमर यांनी वाढत्या इंधनाच्या किमतीवर लोकांना एक विचित्र उपाय सांगितला आहे. माध्यमांशी बोलताना त्यांनी पेट्रोल डिझेल महत्त्वाचे आहे की देशाचे हित असे देखील विचारले आहे.

मध्य प्रदेशचे उर्जा मंत्री तोमर यांनी म्हटले की, “पेट्रोल आणि डिझेलचे दर वाढले तर काय झाले? बाजारात भाजी आणायला जाताना कधी आपण सायकल वापरतो का? ज्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. आपल्याला पेट्रोल डिझेल महत्त्वाचे आहे की आरोग्य आणि देशाचे हित महत्त्वाचे आहे.” महागाई वाढत असल्याचे मान्य करत त्यांनी इंधनाच्या दरवाढीवर आणखी एक विचित्र युक्तिवाद केला. प्रद्युम्नसिंग तोमर म्हणाले की, पेट्रोल आणि डिझेलमधून येणारे पैसे हे नफा लोकांच्या उपचारासाठी खर्च केला जात आहेत.

इंधन दरवाढीप्रकरणी केंद्रीय मंत्र्यावर गुन्हा दाखल; कट रचल्यामुळे किंमती वाढल्याचा आरोप

Explained: इंधनदरवाढीमागे ऑइल बॉन्ड असल्याचं मोदी सरकार सांगतंय, पण ‘ऑइल बॉन्ड’ म्हणजे काय?

तोमर यांनी माजी मुख्यमंत्री कमलाथ यांच्यातर्फे मुख्यमंत्री शिवराज सिह चौहान यांना तीन महिन्यांचे वीज बिल माफ करण्याच्या पत्राबाबतही भाष्य केले. जे दर त्यांच्या काळात लागू करण्यात आले आहेत तेच आतासुद्धा आहेत. त्यांनी दावा केला आहे की, मध्य प्रदेश देशातील पहिले राज्य आहे जिथे १०० यूनिट वीज शंभर रुपयांना मिळते. त्यामुळे कमलनाथ यांनी स्पष्ट करावं की तो कोणत्या लोकांच्या बिलासंदर्भात बोलत आहेत. फक्त जे लोक राज्यात उच्च जीवनशैलीचे जीवन जगतात, त्यांचे वीज बिल शंभराहून अधिक येते.