दोन दिवसांपूर्वी दूरदर्शनच्या लोगोचा रंग बदलण्यात आल्यामुळे त्यावरून मोठी चर्चा पाहायला मिळाली. या रंगबदलावर प्रामुख्याने राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया उमटल्या. दूरदर्शनचे विद्यमान कार्यकारी संचालक गौरव द्विवेदी यांनी हा बदल राजकीय घटनांशी संबंधित असल्याचा दावा फेटाळून लावला आहे. मात्र, त्याचवेळी दूरदर्शनची प्रमुख संस्था असणाऱ्या प्रसार भारतीचे माजी सीईओ आणि तृणमूल काँग्रेसचे विद्यमान राज्यसभा खासदार जव्हार सरकार यांनी या बदलावर परखड शब्दांत हल्लाबोल केला आहे.

नेमका काय बदल केला आहे?

डीडीनं मंगळवारी यासंदर्भात एक्सवर (ट्विटर) माहिती दिली. “आमची तत्त्व तीच आहेत, पण आता आम्ही नव्या स्वरूपात येत आहोत. याआधी कधीही नव्हतं, असं बातम्यांचं स्वरूप आता येत आहे. वेगापेक्षा नेमकेपणा, दाव्यांपेक्षा तथ्य आणि चर्चांपेक्षा सत्य सादर करण्याची हिंमत आमच्यात आहे. कारण जर एखादं वृत्त दूरदर्शनवर आहे, तर मग ते सत्य असणारच. डीडी न्यूज, सत्याचा विश्वास”, असं या पोस्टमध्ये डीडीनं नमूद केलं होतं. त्यासह डीडीच्या न्यूजरूममधील एक व्हिडीओही नव्या लोगोसह शेअर करण्यात आला आहे.

What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
devendra fadnavis uddhav thackeray
“अमित शाह तुला म्हणाले दोन मोठी…”, उद्धव ठाकरेंनी फडणवीसांचा एकेरी उल्लेख करत सांगितलं शहांच्या मातोश्री भेटीवेळी काय घडलं?
DD news anchor faints during live news reading
Heatwave : उष्माघाताची बातमी देताना दूरदर्शनची अँकर स्टुडिओतच कोसळली, VIDEO व्हायरल
Sharad Pawar On Eknath Khadse join Bjp
एकनाथ खडसेंच्या भाजपा प्रवेशावर शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “नाईलाजाने…”
pm modi on prajwal revanna sex tape row
प्रज्वल रेवण्णा प्रकरणावर पंतप्रधान मोदींनी पहिल्यांदाच केलं भाष्य; म्हणाले…
UP 10th Standard Topper Girl Prachi Nigam Facial Hair Controversy
अगं प्राची, दहावी बोर्डात पहिली आलीस पण चेहऱ्यावरचे केस काढता आले नाही? नक्की लाज कुणी सोडलीये?
What Bhai Jagtap Said?
भाई जगताप यांचं मोठं वक्तव्य, “मी काँग्रेस पक्षासाठी ४३ वर्षे दिली आहेत, आता…”
narendra modi shinde fadnavis reuters
फडणवीसांना डावलून शिंदेंना मुख्यमंत्री का केलं? पंतप्रधान मोदींनी सांगितली भाजपाची रणनीती

काय म्हणाले जव्हार सरकार?

दरम्यान, या लोगोच्या रंगबदलाबाबत प्रसार भारतीचे २०१२ ते २०१४ या काळात कार्यकारी संचालक राहिलेले जव्हार सरकार यांनी टीका केली आहे. “नॅशनल ब्रॉडकास्टर दूरदर्शननं ऐतिहासिक लोगोचा रंग बदलून भगवा केला आहे. दूरदर्शनचा माजी सीईओ म्हणून मी त्यांचं भगवीकरण मोठ्या काळजीनं पाहात आलोय. आता मला वाटतंय की हे प्रसार भारती नसून प्रचार भारती आहे”, असं जव्हार रकार यांनी केलेल्या पोस्टमध्ये म्हटलं आहे.

‘हे तर सरकारी माध्यमांचे भगवीकरण’, डीडी न्यूजच्या लोगोचा रंग केशरी केल्यानंतर विरोधकांची टीका

“हे सरळ सरळ निवडणूक मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन”

“डीडीनं भगवा रंग आपल्या ब्रँडिंगसाठी निवडणं चुकीचं आहे. त्याला कुणी केशरी म्हणत असेल, कुणी आणखी काही म्हणत असेल. पण या रंगाचा प्रस्थापित संदर्भ सध्या एका धर्माशी जोडला जातो. प्रसारभारतीची पोहोच व्यापक स्तरावर देशात आहे. याचा वापर एका धर्माचा रंग पसरवण्यासाठी वापरणं चुकीचं आहे. देशाच्या राष्ट्रध्वजातही हा रंग आहे, पण त्यासोबत इतर रंगही आहेत. हे सरळ सरळ निवडणूक मार्गदर्शक तत्वांचं उल्लंघन आहे”, असा थेट आरोप सरकार यांनी व्हिडीओमध्ये केला आहे.

दरम्यान, याबाबत इंडियन एक्स्प्रेसनं त्यांच्याशी संवाद साधला असता त्यांनी सविस्तर भूमिका मांडली. “इथे मुद्दा फक्त लोगोचा नाही. दूरदर्शनचं आता सगळंच भगवं झालं आहे. सत्ताधारी पक्षाच्या कार्यक्रमांना तिथे सर्वाधिक प्रक्षेपण काळ (एअरटाईम) मिळतो, तर विरोधी पक्षांना क्वचितच तिथे जागा मिळते. राज्यसभेच्या हॉलमधील रंगही बदलून भगवा होत आहे”, असं सरकार म्हणाले.