संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱया दिल्लीतील सामूहिक बलात्कारप्रकरणी बसमालकाविरुद्ध सोमवारी फसवणुकीचा आरोप निश्चित करण्यात आला. तीन आठवड्यापूर्वी या घटनेतील चार दोषींना दिल्लीतील न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली होती. ज्या बसमध्ये पीडित मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आला. त्या बसच्या मालकाविरुद्ध आरोप निश्चित करण्यात आले. दिनेश यादव असे आरोपीचे नाव आहे.
अतिरिक्त मुख्य महानगरदंडाधिकारी विनोदकुमार गौतम यांनी भारतीय दंडविधान संहितेच्या कलम ४२० आणि १८१ यानुसार यादव यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. दोन जानेवारी रोजी यादव याला पोलीसांनी अटक केली होती. तेव्हापासून तो तुरुंगातच आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Dec 16 gangrape court frames charges against bus owner
First published on: 07-10-2013 at 05:48 IST