नागरिकांच्या वाढत्या विरोधामुळे कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे. डिसेंबर अखेपर्यंत सुरू करण्यात येणारी विद्युत निर्मिती आता पुढील वर्षांत जानेवारीत सुरू होण्याची अपेक्षा आहे.
पहिल्या टप्प्यात एक हजार मेगावॉट क्षमतेची ऊर्जानिर्मिती होणार आहे. या प्रकल्पाचे काम ९९.६५ टक्के इतके पूर्ण झाले आहे.
भारत-रशिया संयुक्त प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेणाऱ्या पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री व्ही. नारायणस्वामी यांनी गेल्या आठवडय़ात लोकसभेत सांगितले होते की, कुडनकुलम प्रकल्पाचा पहिला टप्पा डिसेंबरच्या अखेरीस सुरू होईल. तर दुसरा टप्पा पुढील वर्षांच्या ऑगस्टमध्ये कार्यान्वित होईल.
सुरक्षेच्या कारणावरून या प्रकल्पाला स्थानिक नागरिकांचा जोरदार विरोध आहे. मात्र अणुऊर्जानिर्मितीवर अणुऊर्जा नियंत्रक आयोग बारकाईने लक्ष ठेवून आहे. तसेच लवकरात लवकर प्रत्यक्ष कामाला सुरुवात करण्यासाठी प्रयत्न सुरू असल्याचेही प्रकल्पातील अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, पीपल्स मूव्हमेंट अगेन्स्ट न्युक्लिअर एनर्जीचे नेते एम पुष्परायन यांनी सांगितले की, गेले वर्षभर आम्ही हा प्रकल्प रद्द करण्यासाठी आंदोलन करीत आहोत. आता जानेवारीत ऊर्जानिर्मितीचा सरकारचा प्रयत्नही आम्ही रोखणार आहोत.
संग्रहित लेख, दिनांक 14th Dec 2012 रोजी प्रकाशित
कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प लांबला
नागरिकांच्या वाढत्या विरोधामुळे कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे. डिसेंबर अखेपर्यंत सुरू करण्यात येणारी विद्युत निर्मिती आता पुढील वर्षांत जानेवारीत सुरू होण्याची अपेक्षा आहे. पहिल्या टप्प्यात एक हजार मेगावॉट क्षमतेची ऊर्जानिर्मिती होणार आहे. या प्रकल्पाचे काम ९९.६५ टक्के इतके पूर्ण झाले आहे.
First published on: 14-12-2012 at 04:43 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delay of kudankulam nuclear power project