दिल्लीत पाच वर्षीय बालिकेवरील बलात्कार घटनेच्या विरोधात आंदोलक निदर्शनं करत आहेत या पार्श्वभूमीवर इंडिया गेट आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानी आंदोलकांना एकत्रित होण्यापासून रोखण्यासाठी दिल्ली मेट्रोने आणखी दोन मेट्रोची स्थानके बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. सकाळी १० वाजल्यापासून उद्योग भवन आणि ११ वाजता केंद्रीय सचिवालय मेट्रो स्थानके बंद करण्यात आल्याचे दिल्ली मेट्रोच्या अधिका-यांनी सांगितले. दिल्लीचे पोलिस आयुक्त नीरज कुमार यांच्या निलंबनाची मागणी करणारे आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ७-रेसकोर्से येथील पंतप्रधानांच्या निवासस्थानी निदर्शनं करण्याचा प्रयत्न केल्या नंतर काल संध्याकाळी पावणेसात वाजल्यापासून रेसकोर्स स्थानकही बंद करण्यात आले आहे.
उद्योग भवन आणि केंद्रीय सचिवालय मेट्रो स्थानक इंडिया गेट परिसरात आहे तर, रेस कोर्स स्थानक पंतप्रधानांच्या निवासस्थानाच्या परिसरात आहे.
संग्रहित लेख, दिनांक 22nd Apr 2013 रोजी प्रकाशित
निदर्शनांच्या पार्श्वभूमीवर दिल्ली मेट्रोची आणखी दोन स्थानके बंद
दिल्लीत पाच वर्षीय बालिकेवरील बलात्कार घटनेच्या विरोधात आंदोलक निदर्शनं करत आहेत या पार्श्वभूमीवर इंडिया गेट आणि पंतप्रधानांच्या निवासस्थानी आंदोलकांना एकत्रित होण्यापासून रोखण्यासाठी दिल्ली मेट्रोने आणखी दोन मेट्रोची

First published on: 22-04-2013 at 02:55 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Delhi metro closes 2 more stations fearing more anti rape protests