दीपावलीनिमित्त देण्यात येणाऱ्या भेटवस्तूंच्या माध्यमातून मतदारांना दारुचे आमिष दाखविण्याचे प्रकार घडण्याची शक्यता गृहित धरून दिल्ली निवडणूक आयोग आणि अबकारी विभागाने शहरातील दारुच्या विक्रीवर बारकाईने लक्ष ठेवण्याचे ठरविले आहे.
शहरातील दारुविक्री करणाऱ्या ७०५ दुकानांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. दर दोन दिवसांनी अबकारी विभागाचे अधिकारी त्या कॅमेऱ्यांचे फुटेज निवडणूक आयोगाला सादर होणार आहे. निवडणूक अधिकाऱ्यांची भरारी पथकेही कार्यरत ठेवण्यात आली आहेत. दोन दिवसांतून एकदा तरी प्रत्येक दुकानावर अधिकारी पोहोचण्याची दक्षता घेण्यास निवडणूक आयोगाने सांगितले आहे.