दिल्लीतील सामूहिक बलात्काराच्या घटनेतील आरोपीचे घर फटाक्यातील दारूच्या मदतीने तयार करण्यात आलेल्या बॉम्बनी उडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीला जमावाने पकडून पोलिसांच्या हवाली केले. सोमवारी सायंकाळी  दक्षिण दिल्लीतील आरकेपुरम येथील रवी दास कॉलनीतून राजेश ३७ या व्यक्तीला अटक करण्यात आली.
दिल्ली बलात्कारातील आरोपीला धडा शिकवण्याच्या उद्देशाने राजेश आणि त्याचे दोन सहकारी फटाक्यातील दारूच्या मदतीने बनवलेले दोन बॉम्ब आरोपी राम सिंग याच्या घराजवळ ठेवण्यासाठी गेले होते.  मात्र त्यांचे वागणे संशयास्पद वाटल्यामुळे तसेच सामूहिक बलात्कारातील आरोपीचे घर उडवून देण्याची धमकी दिल्यामुळे आजूबाजूच्या लोकांनी त्यांना पकडण्याचा प्रयत्न केला. मात्र राजेश जमावाच्या हाती लागला आणि त्याचे दोन साथीदार पळून जाण्यात यशस्वी ठरले. नागरिकांनी पोलिसांना बोलावून राजेशला त्यांच्या हवाली केले.