शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जन्मदिनी, येत्या २३ जानेवारी रोजी केंद्र सरकारने त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ टपाल तिकीट काढावे, अशी मागणी गुरुवारी राज्यसभेत शिवसेनेचे खासदार भारतकुमार राऊत यांनी केली.
बाळासाहेब ठाकरे यांचे महाराष्ट्राच्या राजकीय व सामाजिक क्षेत्रात तसेच राजकीय व्यंगचित्रकार म्हणून जागतिक पातळीवर केलेल्या कार्याची पावती म्हणून केंद्र सरकारने टपाल तिकीट जारी करण्यासाठी पुढाकार घ्यावा, अशी आपण शिवसेना तसेच महाराष्ट्रातील जनतेच्या वतीने विनंती करीत असल्याचे राऊत यांनी आज राज्यसभेत विशेष उल्लेखात नमूद केले.