मोठे नाक असलेल्या बदकासारखी चोच असलेल्या डायनासॉरचे जीवाश्म अवशेष उत्तर मेक्सिकोत सापडले आहेत.  लॅटिरिन्हस उइत्सलानी जातीचे हे डायनॉसॉर क्रेटॅशियस काळाच्या अगदी उत्तरार्धात म्हणजे ७.३ कोटी वर्षांपूर्वी अस्तित्वात होते. त्यांचे लांबरूंद नाक हे त्यांचे वैशिष्टय़ होते व त्याच्या मदतीने त्यांना वासाची खूपच वेगळी क्षमताही लाभलेली होती.
म्युनिक येथील जीवाश्म संशोधन संस्थेचे मुख्य संशोधक अल्बर्ट प्रिटो माक्र्वेझ यांनी सांगितले की, त्यांच्या शरीरातील उतींची रचना ही विस्तृत होती. त्यांचे मूत्राशय जास्त क्षमतेचे होते. या डायनॉसॉरचे मागचे पाय हे मजबूत होते पायाला पुढचे पाय मात्र  तुलनेने लहान व बारीक होते.
डिस्कव्हरी न्यूजने म्हटले आहे की, चालताना व खाताना लॅटिरहिनस हे नेहमी चार पायांवर चालत असत. जर जोरात पळण्याची आवश्यकता असेल तर ते मागचे दोन पाय उचलत असत. त्यांना शेपटीमुळे शरीराचा तोल सांभाळता येत असे. हे डायनॉसॉर हे तृणभक्षी होते व तरीही त्यांच्या जबडय़ात हजारो दात दाटीवाटीने रचलेले होते, असे प्रिटो माक्र्वेझ यांनी सांगितले.
ज्या वातावरणात लॅटिरहिनस राहत होते ते उबदार होते व त्यावेळची आद्र्रता ही आजच्यापेक्षा जास्त होती कारण तळी व उपसागर अस्तित्वात होते.