तामिळनाडूच्या मुख्यमंत्री जयललिता यांच्याविरुद्ध बंगळुरूच्या न्यायालयात बेहिशोबी मालमत्तेबाबतचा खटला सुरू असल्याने न्यायालयात उपस्थित राहण्याचे टाळण्यासाठीच जयललिता यांनी निवडणुकीची अधिसूचना काढण्यात आलेली नसतानाही आपला निवडणुकीचा कार्यक्रम आणि त्यासाठी पक्षाच्या उमेदवारांच्या नावांची घोषणा केली असल्याचा आरोप द्रमुकचे कोषाध्यक्ष एम. के. स्टालिन यांनी केला आहे.
उमेदवारांच्या नावांची घोषणा आणि निवडणूक दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर करण्याची तत्परता दाखविण्यामागे न्यायालयात उपस्थित राहण्याचे टाळण्याचेच कारण असल्याचे स्टालिन यांनी म्हटले आहे. डीएमडीके अथवा काँग्रेससमवेत आघाडी करण्यात येणार नसल्याचे संकेतही या वेळी स्टालिन यांनी दिले. द्रमुक आघाडीची दारे बंद करण्यात आली असल्याचे ते म्हणाले.