‘हिंदूंनी मुस्लिमांना आपल्या घरात प्रवेश देऊ नये’; राजस्थानातील भाजपा आमदाराचे वादग्रस्त वक्तव्य

गुन्हे करण्यासाठी ते प्रतिबद्द असतात त्यामुळे माझे मुस्लिमांपासून दूर राहण्यामागील हेच प्रमुख कारण असल्याचेही सिंघल यांनी म्हटले आहे.

हिंदू कुटुंबांनी मुस्लिमांना आपल्या घरात प्रवेश देऊ नये, असे अलवार येथील भाजपचे आमदार बनवारी लाल सिंघल यांनी म्हटले आहे.
वादग्रस्त जातीय विधाने करणाऱ्या राजस्थानातील एका आमदाराने मुस्लिमांबाबत पुन्हा एकदा वादग्रस्त वक्तव्य केले आहे. हिंदू कुटुंबांनी मुस्लिमांना आपल्या घरात प्रवेश देऊ नये, असे अलवार येथील भाजपचे आमदार बनवारी लाल सिंघल यांनी म्हटले आहे.


दुसऱ्यांदा आमदाराकी भुषवणारे सिंघल म्हणाले, सर्व प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये प्रामुख्याने मुस्लिम लोकांचाच समावेश असतो. त्यामुळे मी माझ्या घरात, कार्यालयात मुस्लिमांना प्रवेश देणार नाही तसेच त्यांची मतेही मला नकोत. बहुसंख्य मुस्लिम भाजपाला मतं देत नाहीत, मीही त्यांच्याकडे मतं मागण्यासाठी जात नाही. त्यांची मतं मिळवणे म्हणजे त्यांना गुन्हे करण्यापासून दूर ठेवण्यास मदत करण्यासारखे आहे. ज्यासाठी ते प्रतिबद्द आहेत. मुस्लिमांपासून दूर राहण्यामागील माझे हेच प्रमुख कारण असल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

विश्व हिंदू परिषद आणि रा. स्व. संघ यांच्याशी संबंधीत असलेल्या सिंघल यांनी म्हटले की, मुस्लिमांचा गोहत्या, लव्ह जिहाद, बनावट ओळख आणि फसवणुकीसारख्या गुन्ह्यांमध्ये समावेश असतो, त्यामुळे मुस्लिमांपासून नेहमीच दूर राहिले पाहिजे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Do not allow muslims to enter your house rajasthan state bjp controversial statement

ताज्या बातम्या