छत्तीसगडमधील बिजापूर जिल्ह्य़ात केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) व जिल्हा पोलीस यांचे संयुक्त पथक आणि नक्षलवादी यांच्यात शुक्रवारी रात्री झालेल्या चकमकीत आठ ग्रामस्थ ठार, तर अनेकजण बेपत्ता आहेत.

 नक्षलविरोधी दल कोब्रा व सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने बिजापूर जिल्ह्य़ातील गंगालूर भागात शुक्रवारी रात्री तपासणी मोहीम राबवली होती. त्यावेळी एहादसमेटा या ठिकाणी त्यांची कथित नक्षलवाद्यांशी चकमक उडाली. यावेळी दोन्ही बाजूने झालेल्या गोळीबारात आठ जण ठार झाले.   मात्र, तपासाअंती सर्व मृत ग्रामस्थ असल्याचे उघडकीस आले. सीआरपीएफनेही तशी कबुली दिली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी याच परिसरात १७ नक्षलवाद्यांना चकमकीत ठार करण्यात आले होते. मात्र, त्यातील बहुतांश ग्रामस्थच असल्याचे नंतर उघड झाले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

(संग्रहित छायाचित्र)