Body Starting: Vidhan Sabha Election Exit Polls 2023 Result: लोकसभा निवडणूक २०२४ मध्ये होणार आहे. त्याआधीची सेमी फायनल समजल्या जाणाऱ्या पाच राज्यांची सेमीफायनल कोण जिंकणार? हे ३ डिसेंबरला स्पष्ट होणार आहे. अशात एग्झिट पोल समोर आले आहेत. राजस्थान, मध्यप्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा आणि मिझोरम या पाच राज्यांचं मतदान पार पडलं आहे. या पाचही राज्यांविषयी एग्झिट पोलचे अंदाज काय सांगतात? जाणून घेऊ
तेलंगणाविषयी कुठला एग्झिट पोल काय सांगतो?
मॅजिक फिगर : ६०
‘इंडिया टीव्ही-सीएनएक्स’ : या पोलनुसार बीआरएसला ३१ ते ४७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला ६३ ते ७९ जागा मिळण्याचा अंदाज, भाजपाला २ ते ४ जागांवर समाधान मानावं लागेल असा अंदाज. एआयएमआयएमला ५ ते ७ जागा मिळतील असा अंदाज. या पोलनुसार काँग्रेसची तेलंगणात स्पष्ट बहुमताने सत्ता येईल.
‘जन की बात’ : या पोलनुसार बीआरएसला ४० ते ४५ जागा मिळतील, काँग्रेसला ४८ ते ६४ जागा मिळतील असा अंदाज आहे. भाजपाला ७ ते १३ जागा मिळण्याचा अंदाज तर एमआयएमलला ४ ते ७ जागा मिळण्याचा अंदाज आहे. या पोलनुसारही काँग्रेसला तेलंगणाची सत्ता मिळण्याचा अंदाज आहे.
रिपब्लिक टीव्ही : बीआरएसला ४६ ते ५६ जागा मिळतील. काँग्रेसला ५८ ते ६८ जागा मिळतील. भाजपाला ४ ते ९ जागा मिळतील. तर एआयएमआयएमला ५ ते ७ जागा मिळतील असा अंदाज आहे.
टीव्ही ९ भारतवर्ष पोलस्टार्ट- यांच्या अंदानुसारा बीआरएसला ४८ ते ५८ जागा मिळण्याचा अंदाज. काँग्रेसला ४९ ते ५९ जागा मिळण्याचा अंदाज आहे. भाजपाला ५ ते १० जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर एआयएमआयएमला ६ ते ८ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
राजस्थान विधानसभेविषयी कुठला एग्झिट पोल काय सांगतो?
मॅजिक फिगर : १००
जन की बात : या पोलनुसार भाजपाला १०० ते १२२ जागा मिळण्याचा अंदाज, ज्यानुसार भाजपाला स्पष्ट बहुमत मिळेल. काँग्रेसला ६२ ते ८५ जागा मिळतील असा अंदाज आहे.
टीव्ही ९ भारतवर्ष-पोलस्टार : या एग्झिट पोलनुसा भाजपाला १०० ते ११० जागा मिळतील हा अंदाज. तर काँग्रेसला ९० ते १०० जागा मिळतील असा अंदाज.
टाइम्स नाऊ-ईटीजी एग्झिट पोलनुसार भाजपाला १०८ ते १२८ जागा मिळतील असा अंदाज तर काँग्रेसला ५६ ते ७२ जागा मिळतील असा अंदाज.
दैनिक भास्करच्या एग्झिट पोलनुसार भाजपाला ९५ ते १०५ जागा मिळण्याचा अंदाज तर काँग्रेसला ८५ ते ९५ जागा मिळण्याचा अंदाज.
इंडिया टुडेच्या पोलनुसार भाजपाला ८० ते १०० जागा मिळतील आणि काँग्रेसला ८६ ते १०६ जागा मिळतील असे अंदाज आहेत.
छत्तीसगड बाबत कुठला एग्झिट पोल काय सांगतो?
मॅजिक फिगर : ४६
इंडिया टुडे च्या ३६ ते ४६ जागा मिळतील असा अंदाज, काँग्रेसला ४० ते ५० जागा मिळतील असा अंदाज आहे.
एबीपी न्यूज सी वोटर्सच्या पोलनुसार भाजपाला ३६ ते ४८ जागा मिळतील हा अंदाज आहे तर काँग्रेसला ४१ ते ५३ जागा मिळतील असा अंदाज आहे.
इंडिया टीव्हीच्या पोलनुसार भाजपाला ३० ते ४० जागा मिळण्याचा अंदाज तर काँग्रेसला ४६ ते ५६ जागा मिळतील असा अंदाज आहे.
जन की बात च्या पोलनुसार भाजपाला ३४ ते ४५ जागा मिळण्याचा अंदाज, काँग्रेसला ४२ ते ५३ जागा मिळण्याचा अंदाज.
दैनिक भास्करच्या पोलनुसार भाजपाला ३५ ते ४५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला ४६ ते ५५ जागा मिळणार असा अंदाज आहे.
मध्य प्रदेशबाबत कुठला पोल काय सांगतो आहे?
मॅजिक फिगर :११६
जन की बातच्या पोलनुसार भाजपाला १०० ते १२३ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर काँग्रेसला १०२ ते १२५ जागा मिळण्याचा अंदाज आहे.
टीव्ही९ भारत वर्ष-पोलस्टार्टच्या पोलनुसार भाजपाला १०६ ते ११६ मिळण्याचा अंदाज तर काँग्रेसला १११ ते १२१ जागा मिळण्याचा अंदाज.
रिपब्लिक टीव्हीच्या पोलनुसार भाजपाला ११८ ते १३० जागा मिळण्याचा अंदाज तर काँग्रेसला ९७ ते १०७ जागा मिळण्याचा अंदाज.
दैनिक भास्करच्या पोलनुसार भाजपाला ९५ ते ११५ जागा मिळण्याचा अंदाज. तर काँग्रेसला १०५ ते १२० जागा मिळण्याचा अंदाज.
मिझोरमबाबत कुठला पोल काय सांगतो?
मॅजिक फिगर २१
जन की बात च्या सर्वनुसार भाजपाला ० ते २ जागा मिळू शकतात असा अंदाज आहे. तर काँग्रेसला ५ ते ९ जागा मिळण्याचा अंदाज आहे. मिझो नॅशनल फ्रंटला १० ते १४ जागा मिळण्याचा अंदाज तर झोरम पीपल्स मूव्हमेंटला १५ ते २५ जागा मिळण्याचा अंदाज.
इंडिया टीव्हीच्या पोलनुसार भाजपाला ० ते २ जागांचा अंदाज, काँग्रेसला ८ ते १० जागांचा अंदाज. मिझो नॅशनल फ्रंटला १४ ते १८ जागांचा अंदाज तर झोरम पीपल्स मुव्हमेंटला १२ ते १६ जागांचा अंदाज आहे.
एबीपी न्यूज सी व्होटर्सच्या पोलनुसार भाजपाला ० ते ५ जागा मिळण्याचा अंदाज आहे. काँग्रेसला २ ते ८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर मिझो नॅशनल फ्रंटला १५ ते २१ आणि झोरम पीपल्स मुव्हमेंटला १२ ते १८ जागा मिळण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.