गोहत्या करणारे भारतात राहूच शकत नाहीत. कोणी बडा नेता आपल्याला वाचवू शकेल या भ्रमात गोहत्या करणाऱयांनी राहू नये त्यांना मंत्री काय पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा वाचवू शकत नाहीत, असे विधान विश्व हिंदू परिषदेचे नेते प्रवीण तोगडिया यांनी केले आहे.

तोगडिया म्हणाले की, मुस्लिम नागरिकांनी हिंदूंच्या भावनांचा आदर करायला हवा. देशातील प्रत्येकाने कायद्याचे पालन करायला हवे. एखाद्या व्यक्तीने कायद्याचे उल्लंघन करून हिंदू नागरिकांच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला तर त्यांना कोणत्या ना कोणत्या प्रकारे उत्तर जरूर मिळेल. एखादा मंत्री आपल्याला वाचवू शकेल या भ्रमात गोहत्या करणाऱयांनी राहू नये.

राम मंदिराच्या मुद्द्यावरही तोगडिया यांनी भाष्य केले. राम मंदिर बनविण्याचा आता एकच मार्ग उरला आहे. सोमनाथ मंदिर उभारताना ज्याप्रमाणे सरदार वल्लभभाई पटेल यांनी कोणतीही परवानगी अथवा न्यायालयाला विचारले नव्हते. भाजपकडे सध्या बहुमत आहे. त्यामुळे सोमनाथ मंदिराप्रमाणेच राम मंदिर देखील भाजप सरकारने कायदा करून उभारले पाहिजे, असे तोगडिया यावेळी म्हणाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.