करोनातून जग सावरत असतानाच ओमायक्रॉनसारख्या नव्या व्हेरियंटमुळे पुन्हा एकदा सर्वांची चिंता वाढवली असून नव्याने निर्बंध लावण्यास भाग पाडलं आहे. करोनाचा खात्मा कऱण्यासाठी जगभरातील शास्त्रज्ञ प्रयत्न करत असताना अद्याप त्यावर कोणताही उपाय सापडलेला नाही. यामुळेच लसीकरणाच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोकांचं करोनापासून रक्षण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. यादरम्यान करोना लसीत धोकादायक ‘ग्रॅफीन ऑक्साइड’ असल्याची एक ऑडिओ क्लिप सध्या व्हायरल झाली आहे.

करोना आल्यापासून सोशल मीडियावर वेगवेगळे दावे करणारे अनेक मेसेज व्हायरल होत आहेत. अशीच एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. लसीमध्ये ‘ग्रॅफीन ऑक्साइड’ असून यामुळे कॅन्सर होण्याचा धोका असतो असा दावा या ऑडिओ क्लिपमध्ये केला जात आहे.

Which yoga asanas can help you burn calories faster? Yoga for weight loss
Weight Loss Yoga: पोट, कंबर व हातांवरील अतिरिक्त चरबी घटवण्यासाठी करा ‘ही’ आसने! चेहऱ्यावरही येईल ग्लो
Bird Flu Outbreak Signs & Symptoms, Treatment
बर्ड फ्लूचा धोका वाढला! चिकन खाण्याआधी ‘ही’ काळजी घ्याच; डॉक्टरांनी सांगितली आजाराची लक्षणे व उपचार
Can weight loss drugs prevent heart attacks
वजन कमी करण्याचे हे औषध हृदयविकाराचा झटका टाळू शकते का? Semaglutide बाबत काय सांगतात डॉक्टर?
water crises banglore
गार्डन सिटी बंगळुरूत पाणीच नाही; तीव्र टंचाईमागे काय आहे कारण?

या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये एक व्यक्ती दावा करत आहे की, “करोना आणि लसीसंबंधी जो घोटाळा सुरु आहे त्यासंबंधी मी लोकांना जागरुक करत आहे. लसीत असणारे घटक धोकादायक आहेत. या लसीची अद्याप चाचणी सुरु असल्याचं सरकारने सांगितलं आहे. कोणत्या व्यक्तीवर याचा काय प्रभाव होत आहे हेदेखील अद्याप सांगण्यात आलेलं नाही. सरकार लोकांना माऱण्याचा कट रचत आहे. याच्यात ‘ग्रॅफीन ऑक्साइड’ आहे”.

पुढे तो म्हणत आहे की, “लस बनवणाऱ्या शास्त्रज्ञांनी स्वत: सांगितलं आहे की, ज्यांच्या लसीत ७० टक्क्यांहून अधिक ‘ग्रॅफीन ऑक्साइड’ असेल ती व्यक्ती १० वर्षांपेक्षा अधिक जगणार नाही”. या व्यक्तीने बुस्टरवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. याआधीही अशा प्रकारची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती ज्यामध्ये लसीत ‘ग्रॅफीन ऑक्साइड’ असल्याचा दावा करण्यात आला होता. दरम्यान केंद्राकडून यासंबंधी स्पष्टीकरण देण्यात आलं आहे.

पीआयबी फॅक्ट चेकने ट्वीट केलं असून या व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये करण्यात आलेला दावा चुकीचा असल्याचं सांगितलं आहे.

करोना लसीत ग्रॅफीन ऑक्साइड नसल्याचं यावेळी स्पष्ट करण्यात आलं आहे. लस घेणं स्वैच्छिक असून करोनापासून आपला बचाव करण्यासाठी गरजेचं असल्याचं सांगण्यात आलं आहे. भारतामध्ये देणाऱ्या येणाऱ्या सर्व लसींना डीजीसीआयकडून मान्यता मिळाली आहे. कोविड हा घोटाळा नसून एक जागतिक महामारी असल्याचं यावेळी सांगण्यात आलं आहे.