दलित कुटुंबातील पाच जणांची हत्या

दलित कुटुंबातील हे पाचही जण १३ मेपासून बेपत्ता झाले होते.

Hooligan on a police record was stabbed to death
पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. (संग्रहीत छायाचित्र)

भोपाळ : मध्य प्रदेशच्या देवास जिल्ह्यातील नेमवार येथे एकाच दलित कुटुंबातील पाच जणांची हत्या करून आरोपीने त्यांचे मृतदेह स्वत:च्याच मालकीच्या शेतात पुरण्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या पाचही जणांचे पुरलेले मृतदेह उकरून बाहेर काढण्यात आले असून राज्याचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी या कुटुंबाला अनुसूचित जाती/जमाती कायद्यान्वये ४० लाख रुपये नुकसानभरपाई जाहीर केली आहे.

या प्रकरणाची सुनावणी शीघ्रगती न्यायालयात होईल, असे चौहान यांनी जाहीर केले असून विरोधी पक्षनेते कमलनाथ यांनी या प्रकरणाच्या सीबीआय चौकशीची मागणी केली आहे. या दलित कुटुंबातील हे पाचही जण १३ मेपासून बेपत्ता झाले होते. मृतांची नावे रूपाली कास्ते, ममताबाई कास्ते, दिव्या कास्ते, त्यांचे चुलते पूजा ओसवाल आणि पवन ओसवाल अशी आहेत. आरोपीचे नाव सुरेंद्रसिंह चौहान असे असून त्याने अन्य सहा जणांच्या मदतीने रूपाली आणि तिच्या कुटुंबीयांची हत्या केली. पोलिसांनी सुरेद्रसिंह याला ताब्यात घेऊन त्याची कसून चौकशी केली असता त्याने पाच जणांची हत्या करून स्वत:च्याच शेतात आठ फूट खोल खड्ड्यात त्यांचे मृतदेह पुरल्याचे उघड झाले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Five members of a dalit family were killed akp

Next Story
पेट्रोल, डिझेल, एलपीजी दरात पुढील आठवडय़ात वाढ?
ताज्या बातम्या