केरळातील तिरुवअनंतपूरम हे मंदिर मंगळवारी सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत बंद ठेवण्यात आलं. या विमानतळाच्या धावपट्टीवरून दरवर्षीप्रमाणे देवाची मिरवणूक काढण्यासाठी विमानतळ प्रशासनाने वाट मोकळी करून दिली. या कालावधीत तिरुवअनंतपूरम विमानतळावर कोणत्याही विमानाचं उड्डाण झालं नाही. हे विमानतळ दरवर्षी दोन वेळा प्रत्येक पाच तासांसाठी बंद ठेवलं जातं. मागील अनेक वर्षांपासून ही प्रथा पाळली जात आहे.

विशेष म्हणजे देवाची ही मिरवणूक विमानतळाच्या धावपट्टीवरून काढली जाते. ज्यामध्ये, हजारो भाविकांसह हत्तींचा समावेश असतो. ही पाच हजार वर्षांची परंपरा आहे. वर्षातून दोन वेळा ही मिरवणूक काढली जाते, यंदा १ नोव्हेंबर रोजी हा उत्सव पार पडला. त्यामुळे मंगळवारी सायंकाळी ४ ते रात्री ९ वाजेपर्यंत येथील विमानतळावरुन कुठल्याही विमानाचे उड्डाण किंवा लँडींग झालं नाही. या कालावधीत ४ आंतरराष्ट्रीय उड्डाणांसह एकूण ६ विमानांची उड्डाण थांबवण्यात आली.

dombivli, thakurli, traffic jam, Thakurli flyover
डोंबिवलीतील ठाकुर्ली उड्डाण पूल कोंडीच्या विळख्यात, दररोज रात्री आठ ते दहा वाजेपर्यंत पुलावर वाहनांचा रांगा
Dombivli, MMRDA to Close mothagaon Mankoli Flyover , mothagaon Mankoli Flyover, mothagaon Mankoli Flyover Bridge Close for four days, dombivali news, Mankoli Flyover Bridge news, Weight load Checking, marathi news, dombivali flyover close
डोंबिवलीतील मोठागाव माणकोली पूल चार दिवस वाहतुकीसाठी बंद
horse decorated with worth rs two lakh stolen from wedding destination
वरातीसाठी सजवलेला घोडा रात्रीच चोरांनी लांबवला, सकाळी नवरदेव….
Mumbai flight canceled due to off runway lights at Nagpur airport
नागपूर: धावपट्टीवर अंधार, मुंबई विमान रद्द

नेमकी प्रथा काय आहे?
तिरुवअंतपूरम विमानतळ परिसरातील पद्मनाभ स्वामी मंदिरातून भगवान विष्णू यांची पालखीत बसवून मिरवणूक काढली जाते. ही मिरवणूक विमानतळाच्या पाठीमागे असलेल्या शांघमुघम समुद्रकिनारी नेण्यात येते. येथे भगवान विष्णू यांना स्नान घालण्यात येते. मागील हजारो वर्षांपासून ही परंपरा जोसापली जात आहे. पण १९३२ मध्ये याठिकाणी विमानतळ बांधण्यात आलं. त्यामुळे, ही पंरपंरा जपत भाविकांच्या श्रद्धेचा आदर करत विमानतळाची सेवा वर्षातून दोनवेळा प्रत्येकी ५ तासांसाठी बंद ठेवण्यात येते.