माजी हवाई दलप्रमुख एस. पी. त्यागी आणि त्यांची पत्नी वंदना त्यागी यांच्या मालकीच्या कंपन्या सुरू झाल्यापासून तीन वर्षांत प्रवर्तकांनी बेहिशेबी कर्ज घेतल्याचे आणि भांडवल ओतल्याचे स्पष्ट झाले आहे.

कंपनी रजिस्ट्रारकडे असलेल्या नोंदींनुसार, अनुरस प्रॉपर्टीज, शवान एण्टरप्रइझेस, मेघनू रिअ‍ॅल्टर्स या कंपन्या असून सध्या सीबीआय त्यांची छाननी करीत आहे. कंपनी रजिस्ट्रारच्या नोंदींनुसार, शवान एण्टरप्रइझेस ही कंपनी आर्थिक आणि व्यवस्थापन सल्लागार कंपनी असून ती त्यागी निवृत्त झाल्यानंतर म्हणजे नोव्हेंबर २०११ मध्ये स्थापन करण्यात आली आहे.

शवान एण्टरप्रइझेसचे अधिकृत भागभांडवल एक लाख रुपयांवरून डिसेंबर २०१२ मध्ये १० लाख झाले आणि डिसेंबर २०१५ मध्ये ते ६० लाखांवर पोहोचले. मार्च २०१३ मध्ये संपलेल्या आर्थिक वर्षांत कंपनीच्या ताळेबंदात कंपनीने २.४ कोटी रुपयांचे दीर्घ मुदतीचे कर्ज घेतले. त्यापैकी २० लाख रुपये सिटिझन सहकारी बँकेच्या नोइडातील शाखेतून घेण्यात आले. उर्वरित कर्जाबाबतचा तपशील मिळाला नाही. अनुरस प्रॉपर्टीज कंपनी ऑगस्ट २०१२ मध्ये स्थापन करण्यात आली आणि ती पायाभूत विकास आणि रिअल इस्टेट क्षेत्रातील होती. तिचे अधिकृत भागभांडवल डिसेंबर २०१२ मध्ये एक लाख रुपये होते ते डिसेंबर २०१५ मध्ये ५० लाख रुपये इतके झाले. त्यानंतर कंपनीने ३.२ कोटी रुपयांचे कर्ज घेतले. त्यांपैकी काही कर्ज हे सिटिझन सहकारी बँकेच्या नोइडा शाखेतूनच घेतले असून त्यासाठी स्थावर मालमत्ता तारण ठेवण्यात आली. उर्वरित कर्जाबाबतची माहिती मिळू शकली नाही.

शवान कंपनीचा महसूल तीन वर्षे काहीच नव्हता तो मार्च २०१५ मध्ये ३६ लाख रुपये इतका झाला तर अनुरस कंपनीचा महसूल १३.९ लाख रुपयांवरून मार्च २०१५ मध्ये ४३.४८ लाख रुपये इतका झाला. या दोन्ही कंपन्यांनी २०१४-१५ मध्ये अनुक्रमे २८ लाख आइण २१.२ लाख रुपये इतका नफा दाखविला.

Story img Loader