Petrol Prices Hiked : १७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात पेट्रोलचे दर शंभरी पार!

देशभरात पेट्रोल आणि डिझेलचे दर सर्वोच्च स्तरावर

 Petrol Diesel Price, Petrol Diesel Price Today
इंधन दर वाढीवरून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका सुरू आहे.(संग्रहीत छायाचित्र)

देशात एकीकडे करोना महमारीचे संकट सुरू असताना, दुसरीकडे पेट्रोल-डिझेल दर वाढीमुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीस आली आहे. सध्या देशभरातील पेट्रोल-डिझेलचे दर सर्वोच्च स्तरावर पोहचले असल्याचे दिसत आहेत. सलग दोन दिवस पेट्रोल-डिझेलच्या किंमतीत वाढ झाल्यानंतर आज (९ जुलै) यामध्ये कुठलाही बदल झालेला नाही. मात्र तरी देखील देशभरातील १७ राज्ये व केंद्रशासित प्रदेशात पेट्रोलच्या दराने शंभरी ओलांडलेली आहे.

इंधन दर वाढीवरून विरोधी पक्षांकडून केंद्र सरकारवर जोरदार टीका केली जात आहे. महाराष्ट्रात काँग्रेस – राष्ट्रवादीने आक्रमक भूमिका घेत, मोदी सरकारविरोधात आंदोलन देखील सुरू केले आहे. जुलै महिन्यात आतापर्यंत पाचवेळा पेट्रोल दरात वाढ झालेली असून, डिझेलच्या किंमती तीन वेळा वाढल्या आहेत.

दिल्लीत आज पेट्रोलचा दर १००.५६ रुपेय, तर मुंबईत १०६.५९ रुपये प्रति लिटर इतका आहे. तसेच, दिल्ली डिझेलचा दर ८९.५२ रुपये व मुंबईत ९७.१८ रुपये आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी काल(गुरूवार) पेट्रोलच्या किंमतीत ३५ पैसे तर डिझेलच्या किंमतीत ९ पैशांची प्रति लिटरमागे वाढ केली होती.

पेट्रोलची शंभरी कुठे?

राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, दिल्ली, आंध्र प्रदेश, तेलंगण, कर्नाटक, जम्मू-काश्मीर, ओडिशा, तमिळनाडू, केरळ, बिहार, पंजाब, सिक्कीम, लडाख, पुडुचेरी, पश्चिम बंगाल या राज्यांमध्ये पेट्रोलने शंभरी गाठलेली आहे.

 

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Fuel price hike petrol prices cross 100 in 17 states and union territories msr

ताज्या बातम्या