‘युनिव्हर्स बॉस’ नावाने लोकप्रिय असलेल्या ख्रिस गेलला सोमवारी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. मुख्य म्हणजे विश्वचषक स्पर्धेत दुसऱ्यांदा गेल शून्यावर माघारी परतला. २००३मध्ये बांगलादेशविरुद्धच गेल एकही धाव न करता बाद झाला होता. त्यामुळे मंगळवारी ‘गेल बांगलादेशविरुद्ध फेल’ अशा मजकूरासह समाजमाध्यमांवर चर्चा रंगली होती. काहींनी १३ चेंडू खेळल्यानंतरही गेलने किती मेहनतीने भोपळा मिळवला, असा विनोद केला. तर काहींनी गेलने विंडीजसाठी शेवटचे शतक कधी झळकावले, हा विचार करणाऱ्या एका चाहत्याचे द्विधामनस्थितीतील छायाचित्र ‘ट्विटर’वर टाकून हशा पिकवला.
संग्रहित लेख, दिनांक 19th Jun 2019 रोजी प्रकाशित
चर्चा तर होणारच.. : गेल बांगलादेशविरुद्ध ‘फेल’
‘युनिव्हर्स बॉस’ नावाने लोकप्रिय असलेल्या ख्रिस गेलला सोमवारी बांगलादेशविरुद्धच्या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही
Written by लोकसत्ता टीम

First published on: 19-06-2019 at 01:24 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Gayle fail against bangladesh