Germany threatens steps against Israel over Gaza : इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांना मोठा धक्का बसला आहे. इस्त्रायलला पाठिंबा देणार्या जर्मनीच्या परराष्ट्रमंत्र्यांनी गाझामध्ये सुरू असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर तेल अवीवविरुद्ध कारवाई करण्याची धमकी दिली आहे. मात्र ही कारवाई कोणत्या पद्धतीची असेल याबद्दल सांगण्यात आलेले नाही. तसेच मानवाधिकार कायद्यांच्या उल्लंघनासाठी कथितपणे वापरल्या जाणाऱ्या शस्त्रांचा पुरवठा बर्लिन करू शकणार नाही, असेही म्हटले आहे.
इस्त्रायलवर ७ ऑक्टोबर २०२३ मध्ये गाझा येथील दहशतवादी गट हमासने हल्ला केला होता. इस्यायली प्रशासनाच्या दाव्यानुसार, या हल्ल्यात किमान १२,०० लोकांचा मृत्यू झाला होता आणि २५० जणांना ओलिस ठेवण्यात आले होते. त्यानंतर जर्मनीसह अमेरिका आणि इतर पाश्चिमात्य शक्तींकडून इस्त्रायलला पाठिंबा दिला जात आहे.
मात्र आता युरोपियन युनियनकडूव त्यांच्या ‘इस्त्रायल पॉलिसी’चा पुनर्विचार केला जात आहे. जर्मनीने शस्त्रांचा पुरवठा आणि पाठिंबा देणे थांबवण्याची इशारा दिला आहे. तर दुसरीकडे युनायटेड किंग्डम, कॅनडा आणि फ्रांस यांनी यापूर्वीच गाझामधील हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर या महिन्याच्या सुरूवातील एक संयुक्त निवेदन जारी करत इस्त्रायलविरोधात ठोस कारवाई करण्याची धमकी दिली आहे.
जर्मन परराष्ट्र मंत्री जोहान वडेफुल यांनी ब्रॉडकास्टर WDR शी बोलताना सांगितले की, “तेल अवीवने बर्लिनकडून दिला जाणारा पाठिंब्याचा साधन म्हणून वापरू नये, गाझामध्ये मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले आणि अन्न व औषध पुरवठ्याचा तुटवडा यामुळे परिस्थिती अत्यंत बिकट आणि असह्य झाली आहे.”
“यहूदी-विरोध याच्या विरोधातील लढ्याप्रति आमची वचनबद्धता आणि स्वत:चे अस्तित्व वाचवण्याचा अधिकार आणि स्टेट ऑफ इस्त्रायलच्या सुरक्षेला असलेला आमचा संपूर्ण पाठिंबा याचा गाझा पट्टीमध्ये सध्या सुरू असलेला संघर्ष आणि युद्धा यामध्ये साधन म्हणून केला जाऊ नये, असे मंत्री वाडेफुल म्हणाले आहेत.
जर्मनीचे परराष्ट्र मंत्री पुढे म्हणाले की, “आम्ही सध्या अशा टप्प्यावर आहोत जेथे आम्हाला पुढील पावले उचलण्यापूर्वी काळजीपूर्वक विचार करण्याची आवश्यकता आहे. जिथे आपल्याला हानी होण्याचा धोका दिसेल तिथे आपण अर्थातच हस्तक्षेप करू आणि निश्चितपणे शस्त्रे पुरवणार नाही, जेणेकरून आणखी हानी होईल,” असे रॉयटर्सने म्हटले आहे.
दरम्यान यापूर्वी जर्मनीचे नवनिर्वाचित चांसलर फ्रेडरिक मर्झ यांनी देखील गाझाविरोधीतल इस्त्रायलकडून केल्या जाणाऱ्या हल्ल्यांबद्दल टीका केली आहे. हमासविरोधातील लढाई न्याय ठरू शकत नाही, आणि हे समजण्याच्या पलिकडे गेले आहे, असे ते म्हणाले.
नेतन्याहू हे म्हणाले आहेत की, त्यांची भूमिका हमासने ओलिस ठेवलेल्यांना वाचवणे यापेक्षा संपूर्ण गाझा ताब्यात घेणे आणि हमास या भागातून पूर्णपणे नष्ट करणे अशी बदलली आहे.