गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांना रक्ताची उलटी झाल्याची माहिती समोर आली आहे. मात्र त्यांच्या छातीत कोणताही संसर्ग झालेला नाही अशी माहिती गोवा सरकारचे प्रतिनिधी प्रमोद सावंत यांनी दिली आहे.

गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना गोवा मेडिकल कॉलेज रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. मुख्यमंत्री कार्यालयाच्या माहितीनुसार मुख्यमंत्री पर्रिकरांना गॅस्ट्रोइंटेस्टाइनल एंडोस्कोपीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरम्यान त्यांच्या काही चाचण्या करण्यात येणार आहे. दरम्यान मनोहर पर्रीकर यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती गोव्याचे आरोग्यमंत्री विश्वजीत राणे यांनी दिली आहे. तर रक्ताची उलटी झाली असली तरीही त्यांच्या छातीत कोणताही संसर्ग झालेला नाही असं प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे.

दरम्यान महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राफेल प्रकरणावरून पंतप्रधान नरेंद्र मोदींना पर्रिकरांनी ब्लॅकमेल केले आहे असा आरोप केला. राफेलची फाईल माझ्या बेडरुममध्ये आहे हे पंतप्रधानांना सांगणे ही धमकीच होती. गोव्यातील सत्तेतून पर्रिकरांना हटवले जाऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर दबाव टाकण्यात आला असेही चव्हाण यांनी म्हटलं आहे.