सरकारने ८५०० टन डाळ आयात करण्याची व्यवस्था केली असून, त्याची पहिली खेप लवकरच भारतात पोहोचती होईल असे आज सांगण्यात आले. सरकारने म्हटले आहे, की डाळीचा राखीव साठा आता ५१ हजार टनांचा झाला आहे. खरिपाच्या हंगामाचे उद्दिष्ट त्यात पूर्ण झाले आहे. जीवनावश्यक वस्तूंची उपलब्धता व दर यांचा आढावा आज घेण्यात आला. या बैठकीत असे सांगण्यात आले, की सरकारने ८५०० टन डाळीची मागणी नोंदवली असून ती लवकरच मिळणार आहे.