एका मृत महिलेच्या पोटात सर्जिकल कात्री (शस्त्रक्रिया करताना वापरली जाणारी कात्री) आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. ही घटना हरियाणातील असून याप्रकरणी आता रूग्णालयाची चौकशी केली जात आहे. झालं असं की, हरियाणातील एक महिलेच्या पोटाची शस्त्रक्रिया करण्यात आली होती. शस्त्रक्रियेनंतर दोनच दिवसांत त्या महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर महिलेच्या कुटुंबियांनी तिच्यावर अंत्यसंस्कारही केले. दोन दिवसानंतर नातेवाईक जेव्हा अस्थी घेण्यासाठी स्मशानभूमीत आले, तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. कारण त्यांना त्या अस्थीत एक सर्जिकल कात्री दिसून आली. त्यांनी लगेच पोलिसांना याची माहिती दिली. शस्त्रक्रियेदरम्यान रूग्णाच्या पोटात कात्री राहिल्यानेच मृत्यू झाल्याचा आरोप मृत महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे.

पेपर मिल कॉलनीतील रहिवासी सुरेंद्र सिंह यांची पत्नी निर्मला (वय ५२) यांना अनेक दिवसांपासून पोटात दुखत होते. उपचारासाठी त्यांना जगाधरी येथील एका खासगी रूग्णालयात नेण्यात आले. निर्मला यांची तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी शस्त्रक्रियेशिवाय काही पर्याय नसल्याचे त्यांना सांगितले.

Accused who absconded after killing arrested after 34 years
हत्या करून फरार झालेल्या आरोपीला ३४ वर्षांनी अटक; गुन्हे शाखा १ ची कारवाई
tankers, Tanker inspection drive,
टॅंकरच्या बेदरकारपणाला आवर, अपघात दुर्घटनेनंतर वाहतूक विभागाकडून टॅंकर तपासणी मोहीम
husband, forceful sexual relationship, wife, mother in law, took picture, incident, case registered , panvel, khandeshwar, crime news, police, marathi news,
पनवेल : ‘त्या’ विकृत सासू विरोधात सूनेने केली अखेर फौजदारी तक्रार
Bail
अयोग्य स्पर्श केल्याने महिलेकडून एकाची हत्या; तीन वर्षांचा कारावास भोगल्यानंतर कोर्ट म्हणतं, “स्वसंरक्षणार्थ…”

डॉक्टरांनीच सल्ला दिल्यामुळे सुरेंद्र सिंह यांनी गेल्या शनिवारी निर्मला यांना रूग्णालयात दाखल केले. मंगळवारी शस्त्रक्रियेनंतर निर्मला यांना अतिदक्षता विभागात हलवण्यात आले. डॉक्टरांनी शस्त्रक्रिया यशस्वी झाल्याचे त्यांना सांगत यापुढे पोटाची कोणतीच समस्या येणार नसल्याचे म्हटले.

परंतु, दोन दिवसांनंतरही निर्मला यांच्यात कोणतीच सुधारणा दिसली नसल्याचे सुरेंद्र सिंह यांनी सांगितले. त्यांचे पोट पूर्वीपेक्षाही अधिक दुखू लागले होते. डॉक्टर भुलीचे इंजेक्शन देऊन त्यांची धुळफेक करत होते, असा आरोप सुरेंद्र सिंह यांनी केला. दोन दिवसांनी अचानक निर्मला यांचा मृत्यू झाला. संध्याकाळी यमुना गल्लीतील स्मशानभुमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

यमुना नगरचे पोलीस अधीक्षक राजेश कालिया यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंत्यसंस्कार झाल्यानंतर दोन दिवसांनी त्यांच्या अस्थीमध्ये कात्री मिळाल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी नातेवाईकांनी तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत असल्याचे ते म्हणाले.