मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुकांचा जोरदार प्रचार सुरू आहे. भाजपा आणि काँग्रेस दोन्ही पक्षांनी आपआपले स्टार प्रचारक निवडणूक प्रचाराच्या मैदानात उतरवले आहेत. भारतीय जनता पक्षाच्या खासदार आणि अभिनेत्री हेमामालिनी या देखील गेल्या काही दिवसांपासून विधानसभा निवडणुकांच्या प्रचारामध्ये व्यस्त आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हरदा मतदारसंघातून भाजपाच्या उमेदवारासाठी त्या प्रचार करत आहेत. त्यांच्या प्रचारासाठी आयोजित केलेल्या एका प्रचारसभेमध्ये हेमामालिनी यांनी त्यांच्या गाजलेल्या चित्रपटातील डायलॉगचा आधार घेतल्याचं पाहायला मिळालं. मथुरेच्या खासदार असलेल्या हेमामालिनी यांनी शोलेतील ‘बसंती तेरे इज्जत का सवाल है’ हा डायलॉग म्हणत मतदारांना भाजपासाठी मतदान करण्याच आवाहन केलं.

१९७५ साली प्रदर्शित झालेला ‘शोले’ हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत आहे. त्यामुळे या चित्रपटातील संवादाचा आधार घेत या संवाद थोडासा बदलत त्यांना मतदारांना भाजपाला मत देण्याचा आवाहन केलं. यावेळी ‘ये बसंती तांगेवाली आज आपके शहर में आई हैं और उसकी इज्जत का सवाल है’ असं त्या म्हणाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून हेमामालिनी या भाजपाच्या उमेदवारांसाठी प्रचार करत असून या निमित्ताने त्या अनेक शहर,गावांना भेट देत आहेत.

 

मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Hemamalini campaign in support of bjp candidate
First published on: 21-11-2018 at 10:51 IST