येथील दोन मजली कस्तुरबा गांधी रुग्णालयाचा काही भाग कोसळून त्याखाली अनेक रुग्णांसह काही अभ्यागत सापडले असल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
हे रुग्णालय ६० वर्षांहूनही अधिक जुने आहे.
 रुग्णालयातील महिलांचा कक्ष असलेला भाग सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास कोसळला व त्याखाली महिला रुग्णांसह अनेक रुग्ण गाडले गेले असावेत, असे मध्य प्रदेशचे नागरी प्रशासनमंत्री बाबुलाल गौर यांनी सांगितले.
दगडमातीच्या ढिगाखालून अनेक रुग्णांना जिवंत बाहेर काढण्यात आले असून मदत आणि बचावकार्य वेगाने सुरू असल्याचे ते म्हणाले.