चेहरा आणखी सुंदर दिसावा यासाठी तरुण-तरुणी वेगवेगळे उपाय करतात. कोणी घरगुती उपाय करून सौंदर्य खुलवण्याचा प्रयत्न करतं तर कोणी थेट डॉक्टरांकडे जाऊन शस्त्रक्रिया करण्याचा पर्याय स्वीकारतं. मात्र शस्त्रक्रियेचा हा निर्णय कधीकधी जीवावार बेतू शकतो. असाच एक प्रकार हैदराबादमध्ये घडलाय. लग्न अवघे आठवड्यावर आलेले असताना तरुणाने मोहक हास्यासाठी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. मात्र या शस्त्रक्रियेदरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. मोहक हास्याच्या हव्यासापोटी या तरुणाला आपला जीव गमवावा लागलाय.

नेमकं काय घडलं?

मिळालेल्या माहितीनुसार २८ वर्षीय लक्ष्मी नारायण विंजाम या तरुणाचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला आहे. चेहऱ्यावरील हास्य आणखी खुलावे, स्मितहास्य आणखी मोहक व्हावे म्हणून त्याच्यावर शस्त्रक्रिया केली जात होती. हैदराबादमधील ज्युबली हिल्स परिसरात असलेल्या एफएमएस इंटरनॅशनल डेन्टल क्लिनिकमध्ये १६ फेब्रुवारी रोजी ही शस्त्रक्रिया करण्यात येत होती. मात्र शस्त्रक्रियेदरम्यान या तरुणाचा मृत्यू झाला.

A layer of Water Hyacinth due to pollution in the river saved the life of a young woman who committed suicide
तरुणीने आत्महत्या केली, पण जलपर्णीने वाचवले; ग्रामस्थांनी वेळेत मदत केल्याने तरुणी सुखरूप
What can you do to reduce back pain
स्त्री आरोग्य : कंबरदुखीने त्रस्त आहात?
Womens Health Family Planning Surgery with Caesarean
स्त्री आरोग्य : सिझेरियन सोबत कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया?
infants with spina bifida surgery possible in the mother s womb
आईच्या गर्भातच होणार बाळावर शस्त्रक्रिया; स्पायना बीफिडाग्रस्त मुलांना मिळणार दिलासा

भुलीच्या इंजेक्शनमुळे मृत्यू झाल्याचा वडिलांचा आरोप

शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाल्यानंतर लक्ष्मी नारायण विंजाम या तरुणाच्या वडिलांना रुग्णालयात बोलावण्यात आले आणि घडलेला प्रकार सांगण्यात आला. लक्ष्मी नारायणच्या वडिलांनी त्याला अन्य रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आले. शस्त्रक्रियेदरम्यान भुलीच्या इंजेक्शनचे प्रमाण जास्त झाल्यामुळे माझ्या मुलाचा शस्त्रक्रियेदरम्यान मृत्यू झाला, असा दावा लक्ष्मी नारायणच्या वडिलांनी केला आहे.

शस्त्रक्रियेबद्दल घरच्यांना कल्पना नव्हती

विशेष म्हणजे लक्ष्मी नारायणने या शस्त्रक्रियेबद्दल घरी काहीही सांगितले नव्हते. या प्रकरणी पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली असून हलगर्जीपणाच्या आरोपाखाली रुग्णालय प्रशासनाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस रुग्णालयातील सर्व नोंदी तपासत आहेत. तसेच सीसीटीव्ही तपासले जात असून या प्रकरणाची सखोल चौकशी केली जात आहे.