सध्या हैदराबाद महानगरपालिकेच्या १३० जागांसाठी मतमोजणी सुरू आहे. सुरूवातीच्या कलांमध्ये भाजपानं सध्या ८७ जागांवर आघाडी घेतली होती. परंतु आता भाजपा पिछाडीवर असून टीआरएसनं ६५ जागांवर आघाडी घेतली आहे. दरम्यान, भाजपा सध्या ४१ जागांवर तर असुद्दीन ओवेसी यांच्या एमआयएम ३२ जागांवर आघाडीवर आहे. भाजपानं ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. तसंच अनेक दिग्गजांनी या ठिकाणी दौराही केला होता.
यापूर्वी २०१६ मध्ये पार पडलेल्या निवडणुकांमध्ये भाजपा युतीला केवळ ५ जागांवर विजय मिळाला होता. यापूर्वी सर्वच पक्षांनी या निवडणुकीत स्वत:ला झोकून दिल्याचं दिसलं होतं. दरम्यान, हाती आलेल्या कलांनंतर भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ट्वीट करत हैदराबादमध्ये आपला विजय आहे, पुढची वेळ मुंबई महानगपालिकेची आहे, असं म्हटलं.