scorecardresearch

२०२०मध्ये Youtuber नी भारतीय GDP मध्ये दिले ६,८०० कोटींचे योगदान

सहा आकड्यांची किंवा त्यापेक्षा अधिक कमाई करणाऱ्या युट्युब चॅनेल्सची संख्या दरवर्षी ६० टक्क्यांनी वाढत आहे.

भारतामध्ये १ लाखापेक्षा जास्त सब्स्क्रायबर असणाऱ्या युबीयूब चॅनेलची संख्या ४०,००० इतकी आहे. (Indian Express File Photo)

युट्युबने आज ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्स या स्वतंत्र सल्लागार कंपनीचा एक नवीन अहवालाचे अनावरण केले, ज्यामध्ये युट्युबच्या निर्मात्या इकोसिस्टमने २०२०मध्ये भारतीय जीडीपीमध्ये ६८०० कोटी रुपयांचे योगदान दिले आहे. या अहवालानुसार, याच वर्षात युट्युबने ६ लाख ८३ हजार ९०० पूर्णवेळ नोकऱ्यांचे समर्थन केले.

एपीएसीचे प्रादेशिक संचालक, अजय विद्यासागर यांनी सांगितले की, “देशातील निर्मात्या अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक वाढ, रोजगार निर्मिती आणि सांस्कृतिक प्रभावावर परिणाम करणारी सॉफ्ट पॉवर म्हणून उदयास येण्याची क्षमता आहे. आमचे निर्माते आणि कलाकार जागतिक प्रेक्षकांशी जोडल्या जाणार्‍या मीडिया कंपन्यांची पुढची पिढी तयार करत असताना, अर्थव्यवस्थेच्या एकूण यशावर त्यांचा प्रभाव वाढताच राहील.”

Ukraine War: रशियन मांजरांच्या विदेशगमनास बंदी; ‘हे’ आहे कारण

भारतामध्ये १ लाखापेक्षा जास्त सब्स्क्रायबर असणाऱ्या युट्युब चॅनेलची संख्या ४०,००० इतकी आहे, जी वर्षभरात ४५ टक्क्यांहून अधिक वाढ दर्शवते. अधिक भारतीय युट्युब निर्माते या प्लॅटफॉर्मवर संधी आणि प्रेक्षकांच्या शोधात आहेत. “भारतातील युट्युब इकोसिस्टमच्या आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक प्रभावांना अनपॅक करणारा आणि मोजणारा हा पहिला प्रकार आहे,” असे ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सचे सीईओ एड्रियन कूपर म्हणाले.

भारतात, ८० टक्क्यांपेक्षा जास्त सर्जनशील उद्योजकांनी सांगितले की त्यांच्या व्यावसायिक उद्दिष्टांवर या प्लॅटफॉर्मचा सकारात्मक परिणाम झाला आहे. युट्युब, निर्मात्यांना त्यांचा कंटेन्ट मॉनिटाइझ करण्यासाठी आठ भिन्न मार्ग ऑफर करते. सहा आकड्यांची किंवा त्यापेक्षा अधिक कमाई करणाऱ्या युट्युब चॅनेल्सची संख्या दरवर्षी ६० टक्क्यांनी वाढत आहे. अहवालानुसार, युट्युब चॅनेलसह सुमारे ९२% एसएमबीने देखील सहमती दर्शवली की युट्युब त्यांना जगभरातील नवीन प्रेक्षकांपर्यंत पोहोचण्यास मदत करते.

मराठीतील सर्व देश-विदेश ( Desh-videsh ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: In 2020 youtube creators contributed rs 6800 crore to indian gdp pvp

ताज्या बातम्या