भारताच्या लडाख भागात जबरदस्ती घुसखोरी केलेल्या चीनी सैनिकांचे प्रकरण आता गंभीर होत चालले आहे. भारताच्या पुढाकाराने आज भारत आणि चीनमध्ये फ्लॅग मिटींग झाली. मात्र, या बैठकित झालेल्या चर्चेची माहिती उपलब्ध होऊ शकलेली नाही.
दरम्यान, दिल्लीमध्ये चीन दूतावासाच्या अधिका-यांचे म्हणणे आहे कि भारतीय सीमारेषेत चीनी सैनिकांनी घुसखोरी केलेली नाही. आपण आपल्या परदेश मंत्रायलाच्या विधानाशी सहमत आहोत, असंही ते म्हणाले. सोमवारी चीनच्या परदेश मंत्रालयाने घुसखोरीच्या वृत्ताचे खंडन केले होते.    
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार परदेश सचिव रंजन मथाई यांनी या प्रकरणी मागील आठवड्यात चीनचे राजदूत यांच्याशी चर्चा केली आहे आणि त्यांच्यासमोर याबाबत चिंताही व्यक्त केली आहे.
दरम्यान, चीनकडून होणारी घुसखोरी दोन देशांमधील वातावरण बिघडवू शकते, असा इशाराही या बैठकित देण्यात आला आहे. चीनचे काहीही म्हणणे असले तरी वास्तविकरित्या दोन्ही देशांची नियंत्रण रेषेबाबत वेगळ्या भूमिका आहेत. याआधीही अशा घटना झाल्या असून त्यां विशिष्ट पध्दतिने सोडवण्यात आल्या आहेत. चीनसोबत कूटनीती आणि लष्कर या दोन्ही स्तरांवर चर्चा केली जात आहे.
खरंतर,  तिबेटच्या बाजूकडील लडाखच्य़ा दौलत बेग ओल्डी परिसरात १५ ते २० चीनी सैनिकांनी घुसखोरी केली आहे. एवढेच नव्हे तर, या सैनिकांनी  येथे आपले तंबू देखिल टाकले आहेत आणि सुरवातीची रूपरेषाही आखली आहे. भारतीय सैनिकांनीही चीनी सैनिकांच्या तंबूपासून ५०० मीटर दूर आपला मोर्चा तयार केला आहे.