जम्मू-काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन भारतीय जवानांच्या झालेल्या हत्येमुळे भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असले तरी उभय देशांदरम्यान सुरू असलेल्या द्विपक्षीय चर्चेवर याचा परिणाम होता कामा नये, हा संवाद सुरूच राहायला हवा, अशी इच्छा अमेरिकेने व्यक्त केली आहे.
उभय देशांमध्ये निर्माण झालेला तणाव हा चर्चेमुळेच निवळू शकतो यावर आमचा ठाम विश्वास आहे. त्यामुळे त्यासाठी भारत-पाकिस्तानदरम्यान वरिष्ठ पातळीवर सुरू असलेली चर्चा यापुढेही अशीच कायम राहावी असे आम्हाला वाटते, असे अमेरिकेच्या परराष्ट्र खात्याच्या प्रवक्त्या व्हिक्टोरिया नूलॅण्ड यांनी प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन भारतीय जवानांच्या झालेल्या हत्येच्या घटनेवर प्रतिक्रिया देताना सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 12th Jan 2013 रोजी प्रकाशित
भारत-पाकमध्ये चर्चा सुरू राहावी- अमेरिका
जम्मू-काश्मीरमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर दोन भारतीय जवानांच्या झालेल्या हत्येमुळे भारत-पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असले तरी उभय देशांदरम्यान सुरू असलेल्या द्विपक्षीय चर्चेवर याचा परिणाम होता कामा नये
First published on: 12-01-2013 at 12:40 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India pakistan dialogue must continue