भारतीय रेल्वेने प्रवाशांसाठी खूशखबर दिली आहे. आता तत्काळ तिकिट रद्द केल्यानंतरही प्रवाशाला ५० टक्के रक्कम परत मिळणार आहे. हा नवा नियम १ जुलैपासून लागू होणार आहे. नव्या नियमांनुसार धावत्या रेल्वेत आरएएसी तिकिट कन्फर्म मानले जाईल. सध्या तत्काळ तिकिट रद्द केल्यानंतर काहीच पैसे मिळत नाहीत. आयआरसीटीसीकडून सध्या फक्त इंग्रजी भाषेतच तिकिट दिले जाते. १ जुलैपासून प्रवाशांना विविध भाषांमध्ये तिकिट उपलब्ध होईल. यासाठी भाषा निवडीचा पर्याय निवडावा लागेल.

रेल्वेच्या नियमानुसार अनारक्षित, आरएसी आणि वेटिंग तिकिट रद्द करण्यासाठी अनारक्षितसाठी (द्वितीय श्रेणी) ३० रूपये, द्वितीय श्रेणी (आरक्षित) आणि इतर तिकिट रद्द करण्यासाठी ६० रूपयांचे शूल्क लागते. रेल्वे सुटण्यापूर्वी ४८ तास आधी तिकिट रद्द केल्यास प्रथमश्रेणी आणि एक्जिक्युटिव्ह क्लासवर २४० रूपये, द्वितीय श्रेणी एसी आणि प्रथम श्रेणी एसी क्लासला २०० रूपये शूल्क लागते. तर ४८ तासांपूर्वीपर्यंत तृतीय एसी, एसी चेअरकार आणि तृतीय एसी इकॉनॉमी तिकिट रद्द केल्यास १२० रूपयांचे शूल्क घेतले जाते. तर द्वितीय श्रेणीचे तिकिट रद्द करण्यासाठी ६० रूपयांचे शूल्क द्यावे लागते.

– रेल्वे येण्यापूर्वी ४८ तास ते १२ तासापर्यंत तिकिट रद्द करण्यावर तिकिटाच्या २५ टक्के रक्कम शूल्क लागते. यामध्ये एक अट ठेवण्यात आली आहे. त्यानुसार २५ टक्के किंवा ४८ तासापूर्वीपर्यंतचे शूल्क जे सर्वाधिक असेल ते घेतले जाईल.

– रेल्वे येण्यापूर्वी १२ तासांपूर्वीपासून ते ४ तासांपर्यंत तिकिट रद्द करण्यावर ५० टक्के शूल्क घेतले जाते. यामध्येही एक अट असून ५० टक्के किंवा ४८ तासांपूर्वीपर्यंत हे तिकिट रद्द केल्यास जे सर्वाधिक असले ते शूल्क प्रवाशांना द्यावे लागणार.

– रेल्वेच्या निर्धारित वेळेपूर्वी ४ तास आधी कोणी तिकिट रद्द केले तर त्याला पैसे परत मिळणार नाही.

– आरएसी तिकिट रद्द करण्यासाठी रेल्वे निघण्यापूर्वी ३० मिनिटे आधी तिकिट रद्द केल्यानंतर रद्दीकरण शूल्क वजा केल्यानंतर त्याचा रिफंड मिळेल.

– जर तुमच्याकडे इ-तिकिट आहे आणि रेल्वे रद्द झाली तर त्यासाठी टीडीआर (तिकिट डिपॉझिट पावती) भरण्याची गरज नाही. तुमचा परतावा बँक खात्यात जमा केला जाईल. तर काऊंटर तिकिट रिफंड काऊंटरवरूनच मिळेल.

– जर तुमच्याकडे वेटिंग इ-तिकिट आहे. तर तुम्ही त्या तिकिटावर प्रवास करू शकत नाही. जर वेटिंगमध्ये इ-तिकिट घेऊन प्रवास करत असाल तर ते विनातिकिट मानले जाईल. वेटिंग इ-तिकिट आपोआप रद्द होऊन जाईल. त्याचे पैसे त्या व्यक्तीच्या बँक खात्यात जमा होतील.