लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये (LSE)शिकणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याला हेटाळणीचा सामना करावा लागत आहे. सत्यम सुराणा असे या विद्यार्थ्याचे नाव आहे. एलएसई विद्यार्थी संघटनेच्या सरचिटणीस पदाच्या मतदानाआधी सत्यमला हेटाळणीचा सामना करावा लागला आहे. मागच्यावर्षी ऑक्टोबर महिन्यात सत्यम पहिल्यांदा चर्चेत आला होता. खलिस्तानी समर्थकांनी उच्चायुक्तालयाच्या बाहेर आंदोलन केले असताना भारतीय राष्ट्रध्वज उचलून धरल्यामुळे सत्यम सुराणाचे नाव चर्चेत आले होते. यावेळी सत्यमने सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपा, राम मंदिर आणि भारताबद्दल समर्थन देणारे विधान केले होते. त्यानंतर त्याला चुकीची वागणूक दिली गेली.

सत्यम सुराणाने एक्स या साईटवर आपली भूमिका मांडली आहे. “मागचा आठवडा माझ्यासाठी कठीण होता. एलएसईसारख्या आंतरराष्ट्रीय शिक्षण संस्थेत विद्यार्थी संघटनेचा सरचिटणीस म्हणून मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी खूप जोमात प्रचार केला. मला मिळालेला प्रतिसाद हा खूप उत्साहवर्धक होता”, अशी भावना व्यक्त करताना सत्यमने काही स्क्रिनशॉट या पोस्टमध्ये जोडले आहेत.

telangana suicides
तेलंगणात ११वी आणि १२वीचा निकाल जाहीर होताच काही तासांतच सात विद्यार्थ्यांची आत्महत्या
Supreme Court, noted observation, Maharashtra Law, Acquire Buildings , Cessed Property, Mumbai, Tenant Owner Disputes, Redevelopment, mumbai news, buildings news,
उपकरप्राप्त इमारतींसाठीच महाराष्ट्राचा कायदा! सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
Neha Hiremath Murder Fayaz Karnataka
नेहा हिरेमठ हत्या प्रकरण; भाजपाचा लव्ह जिहादचा आरोप तर काँग्रेसने म्हटले, “प्रेमसंबधातून…”
High Court relief
वैद्यकीय विषयाच्या विद्यार्थ्याला उच्च न्यायालयाचा दिलासा, पुनपर्रीक्षेची गुणपत्रिका देण्याचे राज्य शिक्षण मंडळाला आदेश

“माझ्या यशामुळे आता भारतविरोधी आणि मोदीविरोधी घटकांना बळ मिळालं आहे. ते माझ्याविरोधात नियोजनबद्ध पद्धतीने प्रचार करत आहेत”, अशी नाराजी पुण्यात जन्मलेल्या आणि काही काळ मुंबईत वकिली केलेल्या सत्यम सुराणाने बोलून दाखविली. तो पुढे म्हणाला, माझे फलक फाडून टाकण्यात आले आहेत, तसेच अनेक ठिकाणी ते खराब केले गेले आहेत. मतदानाच्या २४ तास आधी माझ्यावर विविध शिक्के मारण्यात आले. मला इस्लामोफोब, वर्णद्वेषी, दहशतवादी, फॅसिस्ट आणि इतर विशेषणे लावून हेटाळण्यात आलं. या विशिष्ट टुलकिटने मला भाजपाचा सदस्य असल्याचे दाखविले असून भारताच्या सार्वभौमत्वाला आव्हान देण्यात आले.

देवेंद्र फडणवीसांबरोबरच्या फोटोवरून सत्यम ट्रोल

सत्यम म्हणाला की, भारताचा राष्ट्रध्वज उचलण्याच्या माझ्या कृतीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले. एवढेच नाही तर सत्यमने भारतात भेट दिल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन त्यांच्याबरोबर फोटो काढला होता. हा फोटो वापरून सत्यम सुराणाला कट्टरतावादी असल्याचे बोलले गेले. माझ्यावर उजव्या विचारसरणीचा असल्याचा ठपका ठेवणारा प्रचार जाणूनबुजून करण्यात आला असून यामागे डाव्या विचारसरणीच्या लोकांचा हात असल्याचा आरोपही सत्यमने केला आहे.

ज्या लोकांनी मला लक्ष्य केले, त्या लोकांना भारताची प्रगती पाहावत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विकास साधत असल्यामुळेच काहीजणांचा जळफळाट होत असून ते असा चुकीचा आणि बिनबुडाचा प्रचार करत आहेत, असाही आरोप सत्यमने केला.

भारतीय विद्यार्थ्यांनीच माझ्याविरोधात प्रचार केला

सत्यमने पुढे म्हटले की, मला दुःख या गोष्टीचे झाले की, माझ्याविरोधात प्रचार करणारे बहुसंख्य विद्यार्थी हे भारतीयच आहेत. माझ्याविरोधात द्वेष पसरविणारे आणि भारतीय सार्वभौमत्वावर अविश्वास दर्शविणारे विद्यार्थी भारतीय असल्यामुळे मला अतीव दुःख झाले. भारताविरोधातील मेसेज प्रसारित करणे किती लाजिरवाणे आहे? असा प्रश्नही सत्यमने उपस्थित केला.