रिअल इस्टेट समूह आयआरईओ (IREO) चे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ललित गोयल यांना मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) ही कारवाई केली आहे. ललित गोयल यांच्या विरुद्ध, सुमारे सात कोटी ७० लाख अमेरिकी डॉलरच्या कथित गैरव्यवहाराशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तपास चालू होता. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आलेल्या ललित गोयलची अंमलबजावणी संचालनालयाने तब्बल चार दिवस चौकशी केली. पँडोरा पेपर लीक प्रकरणातही गोयल यांचे नाव पुढे आले होते. यानंतर ईडीने आपल्या चौकशीला गती ही कारवाई केली आहे आहे.

ईडीच्या लुकआउट नोटीसच्या आधारे ललित गोयल यांना दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर थांबवण्यात आले होते. कारवाई पासून वाचण्यासाठी ते देश सोडून पळून जाण्याचा प्रयत्न करत होते अशी माहिती काही माध्यमांनी दिली होती. ईडीच्या अधिकाऱ्यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, ललित गोयलला पकडण्यापूर्वी ते अमेरिकेच्या विमानात बसणार होते.

२०१० मध्ये, गोयल यांनी सुमारे सात कोटी ७० लाख अमेरिकी डॉलर वेगवेगळ्या ट्रस्टला हस्तांतरित केले होते, ज्याबद्दल ईडी या प्रकरणाची चौकशी करत आहे. अहवालानुसार हा पैसा गुंतवणूकदारांचा होता. आयआरईओ हा दिल्ली-एनसीआर मधील एक प्रमुख रिअल इस्टेट समूह आहे.