Israel Iran News Highlights: गेल्या आठवड्याभरापासून इस्रायल व इराण यांच्यात चालू असलेला संघर्ष आता विकोपाला गेला आहे. एकीकडे इस्रायलकडून इराणवर हवाई हल्ले होत असताना इराणकडूनही त्याला प्रत्युत्तर दिलं जात आहे. त्यातच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इस्रायलला पाठिंबा असल्याचं जाहीर करत इराणला जाहीर इशारे द्यायला सुरूवात केली. मंगळवारी ट्रम्प यांनी थेट इराणचे सर्वोच्च नेते अली हुसेनी खोमेनी यांना ठार करण्यासंदर्भात विधान केलं. यानंतर आता इराणकडूनही आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.
Israel Iran Battle Highlights, 18 June 2025: डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीनंतर आता इराणची आक्रमक भूमिका
Israel Iran War: इस्रायल हल्ल्यांची व्याप्ती वाढवणार?
इस्रायलनं आता तेहरानसह अरक आणि खांदाब या शहरांनाही लक्ष्य करण्याचं नियोजन केलं आहे. इस्रायल लष्करानं या शहरांमधल्या नागरिकांना शहर खाली करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
इराणची दोन विमाने ओमानमध्ये उतरली?
अल जझीराच्या वृत्तानुसार, इराणी सरकारच्या नावाने नोंदणीकृत असलेली दोन विमाने ओमानच्या राजधानीत उतरली आहेत. इराणने याबद्दल काहीही माहिती दिलेली नाही, परंतु अमेरिका आणि इराणमधील अण्वस्त्रांबाबतच्या चर्चेत ओमानने मध्यस्थ्या भूमिका बजावत आहे.
हैफासाठी रेड अलर्ट
इस्रायलने हल्ल्यांची तीव्रता वाढल्याने इराणमधील हैफा येथे रेड अलर्ट जाही करण्यात आला आहे. दरम्यान, इराणी सरकारने लोकांना लवकरात लवकर हैफा शहर सोडण्याचे आवाहन केले आहे. सर्वांना सुरक्षित ठिकाणी जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
Israel Iran Attacks Live Updates: इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी केंद्र सरकारचे ऑपरेशन सिंधू
इराण-इस्रायल यांच्यातील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने इराणमधून भारतीय नागरिकांना बाहेर काढण्यासाठी "ऑपरेशन सिंधू" सुरू केले आहे. परराष्ट्र मंत्रालयाने मंगळवारी जाहीर केले की, उत्तर इराणमधून ११० भारतीय विद्यार्थ्यांना यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले असून त्यांना आर्मेनियाला नेण्यात आले आहे.
"मी काय करणार आहे, हे कोणालाही माहिती नाही", इस्रायल-इराण संघर्षावर डोनाल्ड ट्रम्प यांची प्रतिक्रिया
अमेरिकेने इराणवर हल्ला करण्याची किंवा त्यांच्या अणुसुत्रांना लक्ष्य करण्याची योजना आखली आहे की नाही, यावर स्पष्टीकरण देण्यास राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी बुधवारी नकार दिला. त्यांनी पत्रकारांना सांगितले की इरानने संपर्क साधला असला तरी, "चर्चेस खूप उशीर झाला आहे", आणि ते पुढे म्हणाले की, "पुढचा आठवडा मोठा असेल, कदाचित एका आठवड्यापेक्षा कमी. मी काय करणार आहे हे कोणालाही माहिती नाही."
इराणचे 'अंतर्गत सुरक्षा मुख्यालय' उद्ध्वस्त केले; इस्रायलचा संरक्षण मंत्र्यांची माहिती
इस्रायलचे संरक्षण मंत्री इस्रायल काट्झ यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्या हवाई दलाच्या विमानांनी इराणचे 'अंतर्गत सुरक्षा मुख्यालय' उद्ध्वस्त केले आहे. ते म्हणाले की, "हवाई दलाच्या विमानांनी इराण सरकारचे अंतर्गत सुरक्षा मुख्यालय नुकतेच उद्ध्वस्त केले आहे. आम्ही अयातुल्ला खामेनी यांची राजवट कुठे असेल तिथे हल्ला करण्याची शपथ घेतली आहे."
"इस्रायलला अमेरिकेची मदत मध्य पूर्व अस्थिर करू शकते", रशियाचा इशारा
इस्रायल आणि इराण यांच्यातील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर रशियाचे उप परराष्ट्रमंत्री सर्गेई रियाबकोव्ह यांनी इशारा दिला आहे की, इस्रायलला अमेरिकेची थेट लष्करी मदत मध्य पूर्वेतील परिस्थिती पूर्णपणे अस्थिर करू शकते.
इराणला स्वसंरक्षणाचा 'कायदेशीर' अधिकार आहे - एर्दोगान
एएफपीच्या वृत्तानुसार, तुर्कीचे अध्यक्ष रेसेप तय्यिप एर्दोगान म्हणाले की इस्रायलच्या चालू बॉम्बहल्ल्यांना तोंड देऊन इराणला स्वतःचे रक्षण करण्याचा 'कायदेशीर' अधिकार आहे.
"इस्रायलच्या गुंडगिरी आणि राज्य दहशतवादाविरुद्ध स्वतःचे रक्षण करणे हा इराणचा नैसर्गिक आणि कायदेशीर अधिकार आहे." इस्रायली पंतप्रधान नेतान्याहू यांना प्रदेशाच्या सुरक्षेसाठी सर्वात मोठा धोका" असे संबोधल्यानंतर आज पुन्हा त्यांनी इस्रायलवर टीका केली आहे.
इस्रायलचा इराणमधील १,१०० लक्ष्यांवर हल्ला
द टाईम्स ऑफ इस्रायलच्या मते, इस्रायली लष्करी प्रवक्ते एफी डेफ्रिन यांनी दावा केला की इस्रायल अणु धोक्याला निष्प्रभ करण्यासाठी काम करत आहे. त्यांनी सांगितले की इस्रायलने ५ दिवसांत इराणमधील १,१०० लक्ष्यांवर हल्ला केला आहे.
इराण हार मानणार नाही, अमेरिकेच्या हल्ल्याचे गंभीर परिणाम होतील: खामेनी
इराणचे सर्वोच्च नेते खामेनी यांनी म्हटले आहे की, इराण लादलेली शांतता किंवा युद्ध स्वीकारणार नाही. खामेनी यांनी इराणी प्रेसला सांगितले की "(अमेरिकेला) हे माहित असले पाहिजे की, इराण हार मानणार नाही आणि अमेरिकेच्या कोणत्याही हल्ल्याचे गंभीर परिणाम होतील."
कोणत्या देशाकडे किती अण्वस्त्रं आहेत? भारत व पाकिस्तान कितव्या स्थानी? समोर आली ९ देशांची यादी!
Irans Nuclear Facilities are in Good Condition: इराणच्या अणुप्रकल्पांवर सारंकाही आलबेल!
दरम्यान, इराणच्या आण्विक तळांवर सर्व परिस्थिती चांगली आणि नियंत्रणात असल्याचं इराणच्या आण्विक कार्यक्रमाचे प्रमुख इस्लामी यांनी स्पष्ट केलं आहे. रॉयटर्सनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे. एकीकडे इस्रायलकडून सातत्याने इराणच्या आण्विक तळांवर हल्ले चढवण्याचे दावे केले जात असतानाच इराणकडून हे निवेदन जारी करण्यात आलं आहे.
Iran to Retaliate Strongly: इस्रायलला सडेतोड प्रत्युत्तर देऊ, इराणची भूमिका
इस्रायलच्या हल्ल्यांना ताकदीने प्रत्युत्तर दिलं जाईल, अशी भूमिका इराणनं घेतली आहे. "आम्ही आमच्या नागरिकांचं, भूमीचं रक्षण करण्यात कोणतीही कसूर सोडणार नाही. आम्ही या हल्ल्यांना अत्यंत गांभीर्यपूर्वक आणि ताकदीने प्रत्युत्तर देऊ", अशी भूमिका संयुक्त राष्ट्रातील इराणचे राजदूत अली बाहरेनी यांनी मांडली आहे.
Russia Stepped in Israel Iran War: इस्रायल-इराण संघर्षात रशियाची उडी
“इस्रायलकडून इराणच्या शांततापूर्ण आण्विक तळांवर होणारे हल्ले हे आंतरराष्ट्रीय कायद्याचं उल्लंघन आहे. यामुळे आंतरराष्ट्रीय सुरक्षेला मोठा धोका निर्माण झाला आहे. इस्रायलच्या हल्ल्यांनी जगाला आण्विक युद्धाच्या उंबरठ्यावर आणून ठेवलं आहे”, अशी भूमिका रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानं काढलेल्या निवेदनात नमूद करण्यात आली आहे.
Iran Nuclear Program Dismantled: इराणचा आण्विक कार्यक्रम पूर्णपणे नष्ट होण्याच्या मार्गावर?
इराणचा संपूर्ण आण्विक कार्यक्रमच नष्ट करण्याच्या उंबरठ्यावर आपण असल्याचा दावा इस्रायलकडून करण्यात आला आहे. इराणमधील नेतान्झ आण्विक तळावर क्षेपणास्त्र हल्ले करून इस्त्रायलनं तिथे मोठा विध्वंस घडवून आणल्याचं सॅटेलाईट फोटोंवरून स्पष्ट होत आहे. दरम्यान, इराणच्या आण्विक तळांवर मोठ्या प्रमाणावर यंत्रसामग्री आणि इतर साहित्य हे जमिनीत खोलवर असल्यामुळे त्यांचं नेमकं किती नुकसान होऊ शकेल, याबाबत अनिश्चितता व्यक्त केली जात आहे.
Germany on Israel Attack Iran: इस्रायल आमच्यासाठी... जर्मनीची भूमिका
इस्रायलकडून इराणवर हल्ला करण्यात आल्यानंतर त्यावर जर्मनीनं भूमिका मांडली आहे. "इराणला धडा शिकवण्याचं काम इस्रायल आमच्यासाठी करत आहे. आम्हीदेखील इराणच्या शासनकर्त्यांच्या अत्याचारांचे पीडित आहोत. इराणमधील या राज्यकर्त्यांनी जगभरात मृत्यू आणि विध्वंस आणला आहे", अशी प्रतिक्रिया जर्मनीचे चॅन्सलर फ्रेडरिक मार्झ यांनी दिली आहे.
Israel-Iran Conflict: इस्रायल-इराण युद्ध जगाला भोगावं लागणार? कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका, सलग दुसऱ्या दिवशी दरवाढ!
Israel-Iran conflict: भारत आणि इस्रायल टाकणार होते पाकिस्तानवर बॉम्ब; पण, इंदिरा गांधी यांनी माघार का घेतली?
Israel Attacked Irans Weapon Sites: इराणच्या शस्त्रागारांवर इस्रायलचा हल्ला
इराणमधील महत्त्वाच्या शस्त्र उत्पादन केंद्रांवर इस्रायलकडून हवाई हल्ले केले जात आहेत. इस्रायलच्या लष्करानंच यासंदर्भातली माहिती दिल्याचं वृत्त रॉयटर्सनं दिलं आहे.
Oil Prices Shot Up: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका
इस्रायल-इराण संघर्षातून या दोन्ही देशांंचं मोठं नुकसान होत असताना दुसरीकडे कच्च्या तेलाच्या किमतींवर त्याचा विपरीत परिणाम होताना दिसत आहे. मंगळवारी कच्च्या तेलाच्या किमती तब्बल ४ टक्क्यांनी वाढल्यानंतर बुधवारी देखील त्यात वाढ झाली असून प्रतिबॅरल किमती ७५ डॉलर्सच्या वर गेल्या आहेत.
Iran Death Toll: इस्रायलच्या हल्ल्यात इराणच्या ५८५ नागरिकांचा बळी
इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यांमध्ये आत्तापर्यंत इराणमधील ५८५ नागरिकांचा मृत्यू झाला असून तब्बल १३२६ नागरिक जखमी झाले असल्याचं वृत्त असोसिएटेड प्रेसनं दिलं आहे.
US Deployed Fighter Gets in Middle East: अमेरिकेचे फायटर जेट्स मध्य पूर्व आशियात दाखल
इस्रायल व इराण यांच्यातील संघर्ष टोकाला गेला असताना दुसरीकडे अमेरिकेनं आक्रमक भूमिका घेतली आहे. अमेरिकेनं इस्रायलला पाठिंबा दिलेला असताना आता मध्य पूर्व आशियात मोठ्या संख्येनं अमेरिकन फायटर जेट्स दाखल होऊ लागले आहेत. यात प्रामुख्याने F-16, F-22 आणि F-35 या लढाऊ विमानांचा समावेश आहे. रॉयटर्सनं यासंदर्भातलं वृत्त दिलं आहे.
Israel Iran Conflict: दोन्ही देशांची राजधानीची शहरं लक्ष्य
दरम्यान, इराण व इस्रायलनं एकमेकांच्या राजधानीच्या शहरांना लक्ष्य केलं आहे. इराणनं इस्रायलची राजधानी तेल अवीववर क्षेपणास्त्रं डागली असून इस्रायलनं इराणची राजधानी तेहरान व आसपासच्या शहरांना लक्ष्य केलं आहे.
Iran appeals to delete whatsapp: इराणचं नागरिकांना व्हॉट्सअॅप डिलीट करण्याचं आवाहन
व्हॉट्सअॅपकडून आपली माहिती इस्रायलला पुरवली जात असल्याचा दावा इराणकडून केला जात असून इराणनं बुधवारी आपल्या नागरिकांना मोबाईलमधून व्हॉट्सअॅप अनइन्स्टॉल करण्याचे निर्देश दिले आहेत.
Iran on Fatteh-1 Missile Launch: फतेह १ क्षेपणास्त्र डागल्याप्रकरणी इराणची भूमिका
इराणनं बुधवारी पहाटे इस्रायलवर फतेह-१ क्षेपणास्त्रदेखील डागल्याचं सांगितलं जात असून त्यासंदर्भात इराणनं आपली भूमिका मांडली आहे. "या संघर्षातील आत्ताची घडी हा एक टर्निंग पॉइंट असेल. फतेह क्षेपणास्त्र डागल्यानंतर ही शेवटाची सुरुवात झाली आहे. इस्रायलच्या बनावट मिसाईल डिफेन्स सिस्टीमच्या दाव्याचा शेवट होईल", असं इराणमधील सरकारी वृत्तवाहिनी 'मेहर न्यूज'नं सरकारी अधिकाऱ्यांच्या हवाल्याने नमूद केलं आहे.
Iran Launched Fatteh Missile: इराणनं फतेह क्षेपणास्त्र डागलं
दरम्यान, इराणनं इस्रायलवर त्यांचं संहारक फतेह क्षेपणास्त्र डागल्याचा दावा इराणमधील प्रसारमाध्यमांनी केला आहे. फतेह मिसाईल हे एक हायपरसॉनिक मिसाईल असून ते मॅक ५ अर्थात आवाजाच्या वेगाच्याही पाचपट वेगाने लक्ष्यभेद करते, असा दावा सीएनएननं केला आहे.
Isreale Warning Tehran District 18: इस्रायलचा तेहरानमधील नागरिकांसाठी संदेश
इस्रायलनं बुधवारी पहाटेच्या सुमारास तेहरान डिस्ट्रिक्ट १८ मधील नागरिकांना शक्य तितक्या लवकर शहर सोडून जाण्याचा इशारा दिला आहे. "तुम्ही त्या भागात असणं तुमचा जीव धोक्याक घालण्यासारखं ठरेल", असं इस्रायलच्या लष्करानं एक्सवरील अधिकृत अकाऊंटवर पोस्ट केलं आहे.
US Embassy in Jerusalem: जेरुसलेममधील दूतावास बंद ठेवण्याचा निर्णय
इस्रायल-इराण संघर्षाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेनं जेरुसलेममधील आपला दूतावास येत्या शुक्रवारपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात जेरुसलेमसह तेल अवीवमधील कॉन्सुलेट्सही बंद असतील, असंही अमेरिकेकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
Iran Attacked Tel Aviv: इराणचा इस्रायलची राजधानी तेल अवीववर हल्ला
इराणनं इस्रायलची राजधानी तेल अवीव आणि इतर मध्यवर्ती शहरांवर मंगळवारी मध्यरात्री क्षेपणास्त्रे डागल्याचा दावा इस्रायलच्या लष्करानं केला आहे.
Iran Targets Israeli Air Bases: इराणचा इस्रायलच्या हवाई तळांवर हल्ला
इराणच्या लष्करानं इस्रायलच्या हवाई तळांवर हल्ले केल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याच तळांवरून इराणवर ड्रोन व क्षेपणास्त्रे डागण्यात आली होती, असा दावा इराणनं केला आहे. हा हल्ला टप्प्याटप्प्याने आक्रमकता वाढवत नेणाऱ्या बहुआयामी युद्धमोहिमेचा एक भाग आहे, असंही इराणनं स्पष्ट केलं आहे.
इराण अण्वस्रनिर्मितीपासून काही महिने नाही, तब्बल ३ वर्षे दूर! अमेरिकी गुप्तचर खात्याची माहिती, (फोटो-लोकसत्ता ग्राफिक्स टीम)
Israel Iran Conflict Highlights, 18 June 2025: इस्रायल-इराण संघर्षाचा जगावर काय परिणाम होणार?