युवराज विल्यम आणि युवराज्ञी केट यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाल्यामुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये जल्लोषाचे वातावरण पसरले आहे. बाळाचे आगमन देशभरात उत्साहाने साजरे केले जात असून जगभरातून राजघराण्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे. ‘आजोबा’ चार्ल्स, ‘पणजी’ झालेली राणी एलिझाबेथ दुसरी यांनी युवराज आणि युवराज्ञींना शुभेच्छा देतानाच आपापल्या ‘पदोन्नती’चा आनंद व्यक्त केला आहे.
राजघराण्यातील बाळाच्या जन्मानंतर ब्रिटनमध्ये आनंदोत्सव साजरा झाला. चर्चमध्ये घंटा वाजवण्यात आल्या. तोफा उडवण्यात आल्या. लंडनचा ट्राफलगार चौक मंद निळ्या प्रकाशाने आठवडाभर उजळविला जाणार आहे. सकाळी बकिंगहॅम राजवाडय़ात बाळाचे स्वागत करणारी धून वाजवण्यात आली.
नव्या बाळाच्या आगमनासाठी सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या रुग्णालयाच्या कर्मचाऱ्यांबद्दल इंग्लंडचे युवराज विल्यम आणि केट यांनी कृतज्ञता व्यक्त केली आहे. युवराज्ञींच्या बाळंतपणापर्यंतचा कालखंड हा या रुग्णालयासाठी अत्यंत व्यग्र होता. मात्र, कोणीही त्याबाबत तक्रार केली नाही उलट आई आणि बाळाची उत्तम काळजीच घेतली, असे विल्यम यांनी आवर्जून नमूद केले.
ब्रिटनमधील आघाडीच्या ”The sun” या वृत्तपत्राने आपले नाव बदलत ”The sun” असे केले. अमेरिकेचे अध्यक्ष बराक ओबामा, ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांनीही राजघराण्याला अभिष्टचिंतन करणारे संदेश पाठवीत आपला आनंद व्यक्त केला. –
संग्रहित लेख, दिनांक 24th Jul 2013 रोजी प्रकाशित
ब्रिटनमध्ये जल्लोष ; युवराज विल्यम आणि युवराज्ञी केट यांना पुत्ररत्न
युवराज विल्यम आणि युवराज्ञी केट यांना पुत्ररत्नाची प्राप्ती झाल्यामुळे संपूर्ण ब्रिटनमध्ये जल्लोषाचे वातावरण पसरले आहे. बाळाचे आगमन देशभरात उत्साहाने साजरे केले जात असून जगभरातून राजघराण्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.

First published on: 24-07-2013 at 01:34 IST
मराठीतील सर्व देश-विदेश बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Its a boy for prince william and wife kate middleton