जम्मू -काश्मीरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले आहे. शोपियान चकमकीत सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना ठार केले आहे. सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला आहे. त्याचबरोबर शोधमोहीम सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, गुप्तचर यंत्रणांना दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील चीरबाग द्रगाड परिसरात दहशतवादी लपले असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस, लष्कर आणि सीआरपीएफच्या संयुक्त पथकाने चीरबाग द्रागड गावात घेराव घालत शोध मोहीम सुरू केली होती.

त्यानंतर स्वतःला घेरलेले पाहून दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार करण्यास सुरुवात केली. सुरक्षा दलाने दहशतवाद्यांना आत्मसमर्पण करण्यास सांगितले, पण दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरूच ठेवला. सुरक्षा दलांनीही चोख प्रत्युत्तर देत दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला. पोलीस अधिकाऱ्यांनी सांगितले की, परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांनी सुरक्षा दलांवर गोळीबार सुरू केला, त्यानंतर चकमक सुरू झाली आणि दहशतवादी ठार झाले.

“शोपियन एन्काउंटरमध्ये ठार झालेल्या दहशतवाद्यांपैकी एकाची आदिल आह वानी म्हणून आहे, जो जुलै २०२० पासून सक्रिय आहे. लिटर, पुलवामा येथे एका गरीब मजुराच्या हत्येमध्ये त्याचा सहभाग होता. आतापर्यंत, दोन आठवड्यांमध्ये १५ दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला आहे,” असे पोलीस महानिरीक्षक काश्मीर विजय कुमार यांनी सांगितले.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांविरोधात भारतीय लष्कराने आता कंबर कसली आहे. जम्मू -काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यात सुरक्षा दलांना मोठे यश मिळाले असून चकमकीदरम्यान दोन दहशतवादी ठार झाले आहेत. अशाप्रकारे, गेल्या दोन आठवड्यांत सुरक्षा दलांनी १५ दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक बुधवारी सकाळीच सुरू झाली होती.